Join us  

VIDEO : बेचारा विक्की तो गया...! भर पार्टीत नवऱ्यावर संतापली अंकिता लोखंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 2:54 PM

Ankita Lokhande : असं काय घडलं की भर पार्टीत अंकिता लोखंडे पतीवर भडकली?

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande ) व विकी जैन  (Vicky Jain) हे टीव्हीचं लोकप्रिय कपल. कालपरवाच या कपलनं लग्नानंतरचा पहिला सण   धुमधडाक्यात साजरा केला.  होय,अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची ही लग्नानंतरची पहिली होळी होती. त्यामुळे हा सण दोघांसाठीही खास होता.  दोघांनीही होळीचा पुरेपूर आनंद लुटला. आपल्या जवळच्या मित्रांसाठी या कपलने होळीनिमित्त एक पार्टीही ठेवली होती. या पार्टीत एकता कपूर, दिव्यांका त्रिपाठी, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, अनीता हसनंदानी, आरती सिंग, मोनालिसा असे अनेक टीव्ही स्टार्स दिसले. या पार्टीचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पण एका व्हिडीओची सर्वाधिक चर्चा झाली. या व्हिडीओत अंकिता विकीवर चांगलीच भडकलेली दिसतेय.

(video :TellyMasala)

व्हिडीओत अंकिता व विकी दोघंही गुलाबी रंगाने रंगलेले दिसत आहेत.अंकिता समोरून चालत येते आणि विकीवर रागावते. विकी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हीडिओ खूप व्हायरल होत आहे. 

हा व्हिडिओ अंकिता लोखंडेच्या इंस्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. ‘बेचारा विक्की तो गया, लगता है कुछ बडी गलती कर दी है,’असं एका युजरने लिहिलं. अन्य एकाने हा व्हिडीओ पाहून काळजी व्यक्त केली.   दोघांमध्ये सर्व काही ठीक तर आहे ना? अशी कमेंट त्याने केली.

टॅग्स :अंकिता लोखंडेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार