बॉलिवूडमध्ये कतरिना कैफ व विकी कौशलने धूमधडाक्यात लग्न केलं तर टीव्ही टाऊनमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande Wedding) हिच्या ग्रँड वेडिंगनं लक्ष वेधून घेतलं. अंकिताच्या लग्नाचा प्रत्येक सोहळा शाही झाला. अगदी प्री वेडिंग फोटोशूटपासून तर लग्नापर्यंत सगळंच ग्रँड होतं. आता लग्न इतकं लॅव्हिश तर यापुढचं सगळंही तितकंच लॅव्हिश असणार ना! लग्नात येणा-या पाहुण्यांनी अंकिताला महागड्या भेटवस्तू दिल्या. याशिवाय पती विकी जैन (Vicky Jain) यानेही लग्नानंतर अंकिताला एक खास गिफ्ट दिलं. त्याची किंमत तर विचारू नका.
होय, पती विकीने अंकिताला मालदीवमध्ये एक प्रायव्हेट व्हिला गिफ्ट दिल्याचे कळतेय. बॉलिवूड लाईफने एका युट्यूब चॅनलच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. विकीने आपल्या सुंदर पत्नीला गिफ्ट दिलेल्या या व्हिलाची किंमत 50 कोटी रूपये असल्याचं कळतंय.
अंकितानेही विकीला दिलं महागडं गिफ्टचर्चा खरी मानाल तर अंकितानेही पतीला एक खास गिफ्ट दिलं आहे. होय, अंकिताने म्हणे विकीसाठी एक प्रायव्हेट बोट खरेदी केली आहे. या पर्सनलाइज्ड बोटची किंमत 8 कोटी रूपये असल्याचं कळतंय. अंकिता लोखंडे ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर तिचा पती विकी जैन हा एक उद्योगपती आहे. तो विलासपूरच्या एका कोळसा उद्योजकाचा मुलगा आहे.
सेलिब्रिटींनीही दिलं लाखोंचं गिफ्ट मीडिया रिपोर्टनुसार, अंकिताची खास मैत्रीण आणि निर्माती, दिग्दर्शिका एकता कपूरने अंकिताला लग्नात 50 लाखाची भेट दिल्याचं म्हटलं जात आहे. एकताने अंकिताला पहिला ब्रेक दिला होता.
अंकिताची खास मैत्रीण रश्मी देसाईने तिला एक सुंदर डिझायनर साडी भेट केली आहे, त्याची किंमत १० लाख आहे. रश्मी सध्या ‘बिग बॉस15’मध्ये असल्याने ती अंकिताच्या लग्नाला उपस्थित राहू शकली नव्हती.
अभिनेता रित्विक धनजानीने विकीला ब्रँडेड घड्याळ आणि डायमंड नेकलेस दिलं आहे. अभिनेत्री स्मृती झा हिने अंकिताला 5 लाखाची गोल्ड चेन दिली आहे. तर शाहीर शेखने 50 लाखाचे सोन्याचे दागिने दिले आहेत. माही विजने सब्यसाची कलेक्शनची 15 लाखांची एक सुंदर साडी अंकिताला भेट केली आहे.