Join us  

रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मधून अंकिता लोखंडेच्या नवऱ्याचा पत्ता कट, विकी म्हणाला- "मी रिएल लाइफमध्येच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:16 AM

'बिग बॉस' नंतर त्याला 'खतरों के खिलाडी'मध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण, आता रोहित शेट्टीच्या या शोमधून विकी जैनचा पत्ता कट झाल्याचं समोर आलं आहे.

'पवित्रा रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे  तिचा पती विकी जैनसह 'बिग बॉस' हिंदीमध्ये सहभागी झाली होती. अंकिता आणि विकी 'बिग बॉस'मधील लोकप्रिय चेहेरे होते. विकी जैनने तल्लख बुद्धी आणि उत्तम खेळीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. 'बिग बॉस' गाजवल्यानंतर विकी जैनला खतरों के खिलाडी शोची ऑफर मिळाल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे 'बिग बॉस' नंतर त्याला 'खतरों के खिलाडी'मध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या या शोमध्ये 'बिग बॉस' फेम विकी जैन दिसणार असल्याची चर्चा होती. पण, आता रोहित शेट्टीच्या या शोमधून विकी जैनचा पत्ता कट झाल्याचं समोर आलं आहे. विकीने याबाबत मौन सोडत भाष्य केलं आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विकीने खतरों के खिलाडीमधून बाहेर पडल्याचं मजेशीर कारण सांगितलं. "मी खऱ्या आयुष्यात एवढी संकट झेलतो की खतरों के खिलाडीमध्ये जाण्याची मला गरजच नाही", असं विकी म्हणाला. 

त्यानंतर तो म्हणाला, "प्रत्येक जण आपल्या आयुष्यात संकटांचा सामना करत असतो. लाफ्टर शेफ या शोसाठीही आम्ही खूप उत्साहित होतो. पण, जेव्हापासून या शोचं शूटिंग सुरू झालं आहे. तेव्हापासून आम्हाला जेवण बनवावं लागत आहे". सध्या विकी आणि अंकिता सध्या लाफ्टर शेफ या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. विकी एक व्यावसायिक असून त्याचा कोळशाच्या खाणीचा बिजनेस आहे. विकी आणि अंकिताने 'स्मार्ट जोडी' या रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर ते 'बिग बॉस'मध्ये दिसले होते. अनेकदा विकी आणि अंकिता एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. 

टॅग्स :अंकिता लोखंडेटिव्ही कलाकारखतरों के खिलाडी