Join us

"सगळेच मागे लागले आहेत पण...", प्रेग्नंसीच्या चर्चांवर अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:18 IST

अंकिता गुडन्यूज कधी देणार?

अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) टेलिव्हिजनविश्वात आपली वेगळी ओळख बनवली आहे. आधी 'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. बरीच वर्ष ही मालिका चालली. नतंर अंकिता थेट 'बिग बॉस'मध्ये दिसली. शोमध्ये ती नवऱ्यासोबत सहभागी झाली होती. बिग बॉस संपल्यानंतर तिने 'लाफ्टर शेफ' हा शोही केला. दरम्यान बिग बॉसमध्ये असताना अनेकदा अंकिताच्या प्रेग्नंसीबाबत चर्चा झाल्या. अंकिता गुडन्यूज कधी देणार असा प्रश्न सगळेच विचारत आहेत. नुकतंच तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ईटाइम्सशी बोलताना अंकिता लोखंडेने फॅमिली प्लॅनिंगवर मनमोकळा संवाद साधला. ती म्हणाली, "गुडन्यूजसाठी सगळेच माझ्या मागे लागले आहेत. पण मी जेव्हा तयार असेल तेव्हा मी करेनच. जेव्हा होईल तेव्हा सगळ्यांना कळेलच. असं किती लपवणार मी आणि लपवायचं कारणही नाही. सध्या मी फक्त कामावर लक्ष देत आहे. करिअरमधल्या संधींमुळे मी खूप खूश आहे."

ती पुढे म्हणाली, "मला सिनेमा करण्याची संधी मिळत आहे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. तसंच मला लाफ्टर शेफ सारख्या शोचा भाग होता आलं याचा आनंद आहे. मला विकी सोबत बराच वेळ घालवता आला. तसंच नवीन मित्रही झाले. आम्ही त्या शोवर खूप हसलो आहोत. मी वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात चांगला ताळमेळ साधत आहे."

बिग बॉस संपल्यानंतर अंकिता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात दिसली होती. आता ती आणखी कोणत्या सिनेमांमध्ये दिसणार याकडे चाहत्यांचंहही लक्ष लागलं आहे. बिग बॉसमुळे अंकिता आणि विकी या जोडीचाही चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेटिव्ही कलाकारप्रेग्नंसी