Join us

'पवित्र रिश्ता'च्या सीक्वलमध्ये अंकिता लोखंडे पुन्हा दिसणार अर्चनाच्या भूमिकेत, मानवसाठी शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 9:31 PM

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांची लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांची लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी अर्चना-मानवच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या दोघांना या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेच्या सेटवरच सुशांत आणि अंकितामध्ये प्रेम फुलले होते.

पुन्हा एकदा पवित्र रिश्ता मालिकेचा दुसरा भाग डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील वर्षी सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर या मालिकेच्या सीक्वलची चर्चा ऐकायला मिळाली होती. असे समजते आहे की निर्माते या मालिकेच्या सीक्वलवर काम करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पवित्र रिश्ता सीक्वल मालिकेत अर्चना देशमुखच्या भूमिकेत पुन्हा एकदा अंकिता लोखंडे दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूतने साकारलेल्या मानवच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू आहे. अद्याप या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड झाली हे समजू शकलेले नाही.

पवित्र रिश्ता मालिकेत कौटुंबिक ताणतणावात मानव आणि अर्चनाच्या निरागस प्रेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. मानवच्या भूमिकेत जो कोणी नवीन अभिनेता असेल त्यात लोक सुशांतला शोधतील. त्यामुळे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यासाठी खूप मोठे आव्हान असणार आहे.

अंकिता लोखंडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी आणि बागी ३ सिनेमात काम केले आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत