Join us

वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेनंतर शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली- बाबा तुम्ही कायम....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:56 AM

वडिलांच्या निधनाने अंकिताला धक्का बसला आहे. पती विकी जैन तिला सावरताना दिसला.

Ankita Lokhande Father Death: लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचं शनिवारी(१२ ऑगस्ट) निधन झालं आहे. ते ६८ वर्षांचे होते. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पितृशोकामुळे अंकितावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनाने अंकिताच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. अंकिता तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. रविवारी अंकिताने  वडिलांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला.वडिलांच्या निधनानंतर अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

अंकिता लोखंडेने रविवारी रात्री तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये अभिनेत्रीने वडिलांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या प्रार्थना सभेबाबत माहिती दिली आहे. अंकिताने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एका फोटो शेअर केला ज्यावर लिहिले होते, 'तुझी कायम आठवणीत रहाल. शशिकांत लोखंडे. 14 ऑगस्ट 2023. दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत. मालाड पश्चिमेला  ही प्रार्थना होईल. 

वडिलांचा आधार हरपल्यानंतरही अंकिता स्वत:ला खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान विक्की जैन तिला सावरताना दिसला. तिचं सांत्वन करताना पती विकी जैन दिसत आहे.  अंकिताच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले होते.

‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली. या मालिकेतील अर्चना या पात्राने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. मालिकांबरोबरच अंकिता चित्रपटांतही झळकली. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटांत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अंकिताने २०२१मध्ये विकी जैनबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. 

टॅग्स :अंकिता लोखंडे