Join us

माझ्या कठीण काळात मला सावरले,अंकिता लोखंडे 'या' व्यक्तीच्या पुन्हा पडली प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 7:29 PM

माझ्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरेच चढउतार एकत्र पाहिले आहेत. तू मला वचन दिलेस की एक दिवस सर्व काही ठीक होईल. अंकिता लोखंडने शेअऱ केली पोस्ट

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती अनेकदा बॉयफ्रेंड विक्की जैनबरोबर फोटो शेअर करत असते. नेहमीच दोघे सोशल मीडियावर कपल गोल देताना दिसतात. इन्स्टाग्रामवर या दोघांची  अनेक फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा  अंकिता लोखंडे यांनी विकी जैनसाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये, तिने विकीचे आभार मानले आहेत, प्रत्येक अडचणीत, प्रत्येकवेळी साथ दिलीय असे म्हणत तिने सोशल मीडियावर त्याचे आभार मानले आहेत.

तू मला नेहमी माझ्यामुळे चिंतेत असायचा आणि मी तुला नेहमीच सांगितले की मी ठीक आहे, कारण मला माहित आहे तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस. मानावे तितके आभार कमीच आहेत. कारण तू जगातील बेस्ट बॉयफ्रेंड आहे. मला काय हवे आहे हे  सांगण्याची मलाही गरज नाही.कारण सांगण्याआधीच तुला सगळंकाही माहिती झालेलं असतं. मला नेहमी राणीप्रमाणे वागवण्याकरिता. माझ्यासाठी वेळ राखून ठेवण्याकरिता, कितीही व्यस्त असलात तरीही, मागचा पुढचा विचार न करता माझ्या एका हाकेवर धावून येणारा, माझ्या कुटुंबाशी चांगला  नाते निर्माण केले त्यासाठी तुझे आभार.

माझ्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरेच चढउतार एकत्र पाहिले आहेत. तू मला वचन दिलेस की एक दिवस सर्व काही ठीक होईल. तू नेहमीच तुझे वचन पाळले आणि माझ्या पाठीशी उभा राहिलेस. यासाठी मी नेहमीच तुझी आभारी राहील. हे माझ्यासाठी खूप कठिण वर्ष आहे आणि मला माहित आहे की तू माझ्या पाठीशी आहेस. तुझ्याशिवाय मला दुसरे काय करावे सुचत नाही.

 

 

मी तुझ्यावर अजून जास्त प्रेम करू लागले आहे.वाटायचे मी पुन्हा कधीच प्रेमात पडणार नाही.मग एक दिवस मी तुला भेटले. तू माझ्यावर विश्वास ठेवलास.  दोघे प्रेमात पडलो. माझ्या आयुष्यात येण्याबद्दल आणि मला जगातील सर्वात भाग्यवान मुलगी बनवल्याबद्दल धन्यवाद.आज मी देखील तुला  वचन देते की जगातील सर्व आनंद मी तुला देईल म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :अंकिता लोखंडे