Join us

"हे लक्षात ठेवेन..."; Bigg Boss चा सीझन संपताच अंकिता लोखंडेची पहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 14:20 IST

'बिग बॉस' संपल्यानंतर अंकिता सोशल मीडियावर झाली व्यक्त

Bigg Boss 17: बिग बॉस 17 चा महाअंतिम सोहळा काल पार पडला. डोंगरीच्या मुनव्वर फारुकीने यंदाच्या पर्वात विजेतेपद पटकावले. टॉप 5 स्पर्धकांनी फायनल पर्यंत मजल मारली होती. यामध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांचा समावेश होता. यामध्ये अंकिता लोखंडेला(Ankita Lokhande) टॉप 3 मध्ये स्थान मिळवता आलं नाही. टॉप 4 मधून अंकिताचं एविक्शन हे फारच धक्कादायक होतं. हरल्यानंतर अंकिताचा रडवेला चेहरा सर्वकाही सांगून गेला. आता अंकिताने बिग बॉस संपल्यानंतर पहिली पोस्ट केली आहे. 

अंकिताची सोशल मीडियावर पोस्ट

अंकिता लोखंडेने बिग बॉसच्या अखेरच्या क्षणाचे फोटो आणि एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये टॉप 4 मधून बाहेर पडल्यानंतर ती स्टेजवर आली. सलमान खानने यावेळी तिचं अभिनंदन केलं. मात्र अंकिताची सासू, आई आणि विकी जैन निराश झालेले दिसले. आता अंकिताने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले,'हा प्रवास कायम लक्षात राहणारा आणि आनंद देणारा असेल! सलमान खानचेही आभार. मला ही संधी दिल्याबद्दल  कलर्स, जिओ सिनेमाचेही आभार."

अंकिता लोखंडे 'पवित्र रिश्ता'मुळे घराघरात पोहोचली. ती बिग बॉस मधील सर्वात मोठी सेलिब्रिटी स्पर्धक होती. 'इंडस्ट्रीत इतके वर्ष काम करुनही कोणाचा पाठिंबा मिळाला नाही' असं म्हणत तिला ट्रोल करण्यात येत आहे. तसंच विकीसोबतची तिची सततची भांडणंही तिला महागात पडली. प्रेक्षकांनी हळूहळू अंकिताचा पाठिंबा काढून घेतला होता. अखेर मुनव्वरलाच याचा फायदा झाला आणि त्याला जास्त मत मिळाले. 

विकी जैनलाच झाला फायदा

अंकिता लोखंडे बिग बॉसमध्ये पती विकी जैनसोबत सहभागी झाली होती. बिग बॉसमधील अंकिताचं वर्तन पाहता प्रेक्षकांना विकीबद्दलच सहानुभूती वाटू लागली आणि अनेकांनी अंकिताला ट्रोल केलं. बिग बॉसच्या शेवटच्या काही दिवसात तर अंकिता आणि मुनव्वर यांची मैत्रीही तुटली. या सर्व गोष्टींमुळे अंकिता मागे पडली.

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉससलमान खानसोशल मीडिया