Join us

ऐन लगीन घाईत अंकिता वालावलकरचा अपघात, म्हणाली, "नजर लागते हे खरंय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:37 IST

अंकिताने काही दिवसांपूर्वीच नवीकोरी ऑडी कार खरेदी केली होती.

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरचा (Ankita Walawalkar) कालच साखरपुडा झाला. संगीतकार कुणाल भगतसोबत ती उद्या लग्नगाठ बांधणार आहे. अंकिताच्या कोकणातील देवबाग येथील घरीच सोहळा होत आहे. परवा तिची मेहंदी झाली तर काल साखरपुडा झाला. मात्र ऐन लग्नाच्या गडबडीतच अंकिताच्या कारचा अपघात झाला. आपण सुखरुप असल्याची तिने चाहत्यांना सोशल मीडियावरुन माहिती दिली. 

अंकिताने काही दिवसांपूर्वीच नवीकोरी ऑडी कार खरेदी केली होती. जुनी कार विकून तिने ऑडी घेतली. अंकिताचा तिच्या कारवर खूपच जीव आहे हे तिच्या व्लॉगमधून दिसलं होतं. सध्या तिची लग्नाची गडबड सुरु आहे. उद्या लग्न आहे त्यामुळे सर्व नातेवाईत मित्रमंडळी घरातच आहेत. त्यातच अंकिता एका जागी शांत न बसता सतत काही ना काही कामात असतेच. तिच्यात लग्नातही तिची धावपळ सुरु आहे. त्यातच काल तिचा अपघात झाला. ऑडीची काचही फुटल्याचा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, ' आम्ही सुखरुप आहोत पण नजर लागते हे खरंच आहे".

अंकितासाठी चाहते काळजी व्यक्त करत आहेत. तिने सुखरुप असल्याची माहिती सर्वांना दिली आहे. तसंच साखरपुड्याचे सुंदर फोटोही तिने शेअर केले. तिचं लग्न निर्विघ्न पार पडू दे म्हणून चाहतेही प्रार्थना करत आहेत. अंकिता आणि कुणाल गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. झी मराठीच्या एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली. आता ते साताजन्माची गाठ बांधण्यासाठी सज्ज आहेत. अंकिताची मित्रमंडळी, दोघांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडणार आहे.

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरसेलिब्रिटीबिग बॉस मराठीलग्नअपघात