Join us

सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 10:39 IST

अखेर कोकण हार्टेड गर्लने तिच्या दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलाय (ankita prabhu walawalkar)

कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख असणाऱ्या अंकिता वालावलकरने काही दिवसांपूर्वी पार पडलेला बिग बॉस मराठीचा नवीन सीझन गाजवला. अंकिताने बिग बॉसच्या घरात तिच्या बॉयफ्रेंडविषयी खुलासा केला होता. पण तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. अखेर आज दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर अंकिताने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. कुणाल भगत असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव असून तो एक संगीतकार आहे.

कुणाल भगत हा सुप्रसिद्ध संगीतकार असून त्याने अनेक मालिका,  सिनेमांच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. कुणाल आणि अंकिता गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत असं समजतंय. कुणालच्या सोशल मीडियावर त्याचे अंकितासोबतचे खास फोटो पाहायला मिळतात. अंकिताने बॉयफ्रेंड कुणालचा चेहरा दाखवताच अनेकांनी या जोडीचं अभिनंदन केलंय. याशिवाय भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

अंकिताने बिग बॉस मराठी शोमध्ये आपल्या मालवणी बोलीने सर्वांचंच लक्ष वेधलं आणि ती घराघरात पोहचली.अशातच घराबाहेर येताच अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात ती लग्नबंधनात अडकणार आहे. पण,असं असलं तरी अंकिताचा होणार नवरा नक्की कोण याबाबच जाणून घेण्यास तिचे चाहते देखील आतुर होते. आता अंकिताने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर सूर जुळले असं कॅप्शन लिहित बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केलाय. आता या दोघांच्या लग्नाचे वेध त्यांच्या चाहत्यांना लागले आहेत.

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरटेलिव्हिजनबिग बॉस मराठी