Ankita Met Yogita Chavan : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन चांगलाच गाजला. 'बिग बॉस'च्या घरात काही स्पर्धकांमध्ये चांगली मैत्री झाली होती. यातली एक जोडी म्हणजे 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आणि योगिता चव्हाण (Yogita Chavan). अंकिता ही टॉप ५ मध्ये पोहचली होती. पण, योगिताही तिसऱ्या आठवड्यातच घराबाहेर पडली होती. पण, त्यांनी जो थोडासा काळ घरात घालवला. यादरम्यान अंकिता आणि योगिता यांच्यात चांगले संबंध बनले होते. अशातच आता अंकिता आणि योगिताची भेट झाली आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
योगिता आणि तिचा पती सौरभ हे अंकिताच्या घरी पोहचले. यावेळी अंकिताचा होणारा नवरा कुणालदेखील उपस्थित होता. या भेटीच्या फोटो "दोन अतिविचारी व दोन उत्तम संवादक हे एकाच फ्रेममध्ये, पण ते कोण" असं हटके कॅप्शनही तिने दिलं. यावर अभिनेत्री हेमांगी कवीने या फोटोखाली "तू (अंकिता) आणि योगिता अतिविचारी आणि कुणाल-सौरभ हे दोघे उत्तम संवादक" अशी कमेंट केली. यावर अंकिताने ही "अगदी योग्य" असं म्हटलं.
अंकीता वालावलकर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेमध्ये आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात ती कुणाल बरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटलं जात आहे. काहीच दिवसांपूर्वी अंकिताने तिची लग्नपत्रिका शेअर केली होती. तेव्हापासून चाहत्यांना तिच्या लग्नाची आतुरता लागली आहे. मात्र लग्न कधी करणार याची तारीख तिने जाहीर केली नाही. अंकिताचा होणारा नवरा कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे.