महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची (Bigg Boss Marathi Season 5) चर्चा रंगली होती. बिग बॉस संपलं असलं तरी या पर्वातील टॉप-५ मधील स्पर्धक अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे. अंकिता वालावलकरचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहता वर्ग आहे. अंकिता ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच तिने होणाऱ्या पतीला एक महागड गिफ्ट दिलं आहे.
अंकिता वालावलकरचा होणारा पती हा कुणाल भगत हा सिनेविश्वात सक्रिय आहे. कुणाल भगत हा संगीत दिग्दर्शक आहे. अंकिता व कुणाल ‘बिग बॉस’नंतर अनेकदा एकत्र फिरताना दिसले. सोशल मीडियावर ते एकत्र त्यांचे व्हिडीओदेखील शेअर करताना दिसतात. अंकिताने कुणालला एक महागडी भेटवस्तू दिली. अंकिताने कुणालला iPhone 16 Pro फोन भेटवस्तू म्हणून दिला आहे. तिने दिलेले हे गिफ्ट कुणालने थेट गाडीच्या डिक्कीत ठेवलं.
अंकिताने सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये फोनची बॅक गाडीच्या डिक्कीमध्ये असल्याचं दिसतंय. कॅप्शनमध्ये अंकिताने लिहलं, "iPhone 16 Pro द्या नाहीतर सोन्याचा फोन द्या. आम्हाला आवडच नाही". तर व्हिडीओत ती म्हणते, "तु सांग लोकांना... हा 16 Pro अजून गाडीच्या डिक्कीत आहे. काय किंमतच नाही".
अंकिता व कुणाल येत्या फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्गात (Sindhudurg) लग्न करणार आहेत. अंकिता व कुणालने ‘आनंदवारी’ (Anandwari) या गाण्यात एकत्र काम केले होते. अंकिताचा होणारा नवरा कुणालचं गाव अलिबाग आहे. कुणालने आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन (Music Direction) केले आहे. आता त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.