कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया स्टार अंकिता प्रभू वालावलकर (ankita walawalkar) अखेर लग्नबंधनात अडकली आहे. अंकिताने तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत (kunal bhagat) लग्न केलंय. अंकिताच्या लग्नाची धामधूम गेल्या आठवडाभरापासून सुरु होती. अंकिताचं प्री-वेडींग आणि संगीत सोहळ्याच्या फोटो अन् व्हिडीओला लोकांची चांगलीच पसंती मिळाली. अखेर अंकिता आज (१६ फेब्रुवारी) कुणालसोबत लग्नबंधनात अडकली. अंकिताच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (ankita walwalkar wedding)
अंकिता-कुणालच्या लग्नाचे फोटो आले समोर
अंकिता वालावलकर आणि कुणालच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. अंकिताने लग्नासाठी पिवळी साडी नेसली होती. तर कुणालने अंकिताला मॅचिंग असा धोती-कुर्ता परिधान केला होता. अंकिताचं सनई-चौघडे अन् तुतारीच्या स्वरांनी राजेशाही थाटात स्वागत करण्यात आलं. अंकिता-कुणालच्या लग्नाचे फोटो समोर येताच सर्वांनी कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलं. अंकिताने केसात गजरा माळला होता. अंकिताच्या बहिणींनी तिचं लग्नमंडपात वाजतगाजत स्वागत केलं. अंकिता-कुणाल दोघेही खूप छान दिसत आहेत, अशा कमेंट्स त्यांच्या चाहत्यांनी केल्या आहेत.
अंकिताच्या कॅप्शनची चर्चा
अंकिताने सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटो शेअर करुन या फोटोखाली अंकिताने लिहिलेल्या कॅप्शनचीही चर्चा रंगली आहे. अंकिता लिहिते, "वालावलकरांचो थोरलो जावई.. मला बायको केल्याबद्दल माझा नवरा कुणाल भगतचं मी खूप अभिनंदन करते. त्याला खरोखर आशीर्वाद आहेत", असं मिश्किल कॅप्शन अंकिताने लिहिलं. सिंधुदुर्ग वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अंकिता-कुणालने एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये अंकिताने बॉयफ्रेंडबद्दल सर्वांना सांगितलं होतं. अखेर 'बिग बॉस मराठी ५'मधून बाहेर आल्यावर अंकिताने कुणालबद्दल खुलासा केला. कुणाल हा पेशाने गायक-संगीतकार आहे.