Join us

'भाकरवडी'मधील अण्णा आणि महेंद्र यांची मैत्री व्यावसायिक स्पर्धेत बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 6:30 AM

जेडी मजेठीया आणि आतिश कपाडिया ह्या दोघांच्या सहयोगाने निर्मिती करण्यात आलेल्या सोनी सबवरच्या 'भाकरवडी' मालिकेतील पात्र प्रेक्षकांना चकित करण्यासाठी सज्ज आहेत.

ठळक मुद्देअण्णा एक कडक शिस्तीचा आदर्शवादी माणूस आहे तर महेंद्र वेळेसोबत बदलण्यात विश्वास ठेवणारा आहे

जेडी मजेठीया आणि आतिश कपाडिया ह्या दोघांच्या सहयोगाने निर्मिती करण्यात आलेल्या सोनी सबवरच्या 'भाकरवडी' मालिकेतील पात्र प्रेक्षकांना चकित करण्यासाठी सज्ज आहेत. देवेन भोजानी आणि परेश गणात्रा यांसारख्या कलाकारांना एकत्र आणल्याने मालिकेत वैचारिक मतभेद असलेल्या दोन कुटुंबातील संबंध गोडकडू असे रंगलेले बघायला मिळतील. आपले नवीन शेजारी म्हणून महेंद्र ठक्कर (परेश गणात्रा) यांना भेटून अण्णा (देवेन भोजानी) आनंदित आहेत परंतु ही नवी मैत्री लवकरच व्यावसायिक स्पर्धेत बदलणार आहे.

अण्णा एक कडक शिस्तीचा आदर्शवादी माणूस आहे तर महेंद्र वेळेसोबत बदलण्यात विश्वास ठेवणारा. त्यांची मुले गायत्री (अक्षिता मुद्गल) आणि अभिषेक (अक्षय केळकर) पहिल्यांदा भेटतात आणि गायत्रीच्या कुत्र्याच्या बिस्किट नाट्याबरोबर कथेला सुरुवात होते. ह्या नाट्याचा शेवट सुखद होत असला तरी भविष्यात मोठी समस्या उद्भवणार आहे. एकीकडे अण्णा आपल्या गोखले बंधू बाकरवडीच्या व्यवसायाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात पूजा ठेवणार आहेत तर, दुसरीकडे महेंद्र ठक्करचे कुटुंब त्यांना अण्णांच्या दुकानाजवळ नवे खाद्यपदार्थाचे दुकान उघडण्याचा परवाना मिळाल्याचा आनंद साजरा करणार आहेत. खरी धम्माल तेव्हा येते जेव्हा कोणतरी मध्यरात्री अण्णांच्या घरात शिरून त्यांच्या कपाटात खुडबुड करत असताना त्यांच्या हातून बाकरवडीच्या 'सिक्रेट मसाल्याचा' डबा पडतो. तो कोण होता याचा अण्णा शोध घेतील का? महेंद्रच्या दुकानाबद्दल समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल?महेंद्र ठक्कर यांची भूमिका करणारे परेश गणात्रा सांगतात, 'आम्ही आमच्या भाकरवडी मालिकेच्या प्रदर्शनासाठी खूप उत्साहित आहोत आणि आमच्या चाहत्यांनी आमच्यावर केलेल्या प्रेमाने आनंदित आहोत. अशा अप्रतिम आणि प्रतिभासंपन्न मंडळींबरोबर काम करणे हा एक अद्भुत अनुभव आहे.' महेंद्रने उघडलेल्या दुकानाबद्दल प्रतिस्पर्धी म्हणून अण्णा कशी प्रतिक्रिया देतील हे बघणे म्हणजे प्रेक्षकांसाठी धम्माल असेल.'भाकरवडी' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्त सोनी सबवर पहायला मिळणार आहे.

टॅग्स :भाकरवडी मालिका