सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'इंडियन आयडॉल १०' या सिंगिंग रिएलिटी शोमध्ये सर्वोत्कृष्ट १२ कलाकारांपैकी अवंती पटेल हिने रक्षाबंधन विशेष भागात आपल्याला भाऊ नसल्याची खंत व्यक्त केली आणि तिला या सेटवर एक भाऊ भेटला तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द अन्नू मलिक आहे.
'इंडियन आयडॉल १०'च्या रक्षाबंधन विशेष भागात अवंती म्हणाली की,'तिला तिच्या आयुष्यात मोठ्या भावाची खूप उणीव भासते.' त्यावर अन्नू मलिकने तिला आपल्या मनगटावर राखी बांधण्यास सांगून स्वतःकडे मोठ्या भावाची जबाबदारी घेतली.अन्नू मलिकने सांगितले, त्याला बहीण नसल्याची उणीव नेहमीच भासत असे. अन्नू मलिकला दोन भाऊ आहेत आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना नेहमी आपल्याला बहीण नसल्याची खंत वाटत असे. अवंती त्याची चांगली बहीण होईल आणि त्याला ती खूप आवडते. प्रॉडक्शन टीमने लगेच अवंतीसाठी ओवाळणीचे तबक आणि राखीची व्यवस्था केली आणि दोघांनी सेटवर राखी पौर्णिमा साजरी केली. भावानवश झालेल्या अन्नू मलिकने सांगितले, 'अवंती राखी पौर्णिमेबद्दल आणि मोठ्या भावाच्या महत्त्वाबद्दल बोलली तेव्हा मला राहवले नाही. मला बहीण नाही आणि मी तिची भावना समजू शकतो. आयुष्यभर आणि विशेषतः राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्हा तिघा भावांना बहिणीची उणीव भासत आली आहे, ज्यावेळी सर्वत्र उत्सवाचे वातावरण असते. मी आतून हेलावून गेलो आणि जेव्हा मी तिला माझ्या मनगटावर राखी बांधायला सांगितले तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रूच यायचे बाकी होते. पुढील आयुष्यभर मी मोठ्या भावासारखा तिच्या पाठीशी राहण्याचे वचन मी तिला दिले. अगदी कधी मध्यरात्री जरी तिने मला फोन केला तरी मी तिची मदत करीन. मी इंडियन आयडॉल 10 चा आभारी आहे कारण आता मला देखील एक लहान बहीण आहे आणि तिचे नाव अवंती आहे.'