65 वर्षीय भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची 28 वर्षीय गर्लफ्रेंड जसलीन मथारुमुळे जास्त चर्चेत आले होते. अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या या कथित रिलेशनशिपवर कुणाचाही विश्वास बसला नव्हता. अनुप आणि जसलीन यांचे नाते हे फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी रचलेला एक डाव होता. हे स्पष्ट झाले होते तरीही अनुप जलोटा यांनी फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी या थराला जाणे काही त्यांच्या चाहत्यांना रूचले नव्हते. त्यामुळे त्यावेळी प्रचंड टीकेला त्यांना सामोरे जावे लागले होते. बिग बॉस शो संपल्यानंतर अनुप जलोटा फारसे चर्चेत आले नाही.
अनुप जलोटा आता पहिल्यांदाच पौराणिक मालिका 'परमावतार श्री कृष्णा'साठी भक्ती भजन आणि श्लोक गाणार आहेत. मालिकेमध्ये २० वर्षांची काळझेप आणि सुदीप साहीर साकारत असलेल्या भगवान कृष्णाच्या भूमिकेसह 'परमावतार श्री कृष्णा'मध्ये पटकथेच्या माध्यमातून महाभारताच्या आयकॉनिक अध्यायाचा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे.
या अध्यायाला मधुर आवाज देणारे अुनप जलोट भजने व श्लोकांमधून कृष्णाचा महाभारतापर्यंतचा प्रवास वर्णन करतील. तसेच विविध टप्प्यांमध्ये अर्जुनला दिलेली शिकवण देखील सादर करतील. भगवद् गीतेमधील 'यदा यदा ही धर्मस्य'ला उजाळा देत या संगीतकाराने ‘कर्मण्ये वाधिकरस्ते मा फालेषु कदाचन’ आणि ‘परीत्रनाय साधुनांगविनाशाय च दुश्कृताम’ हे देखील गायले आहे. भजन व श्लोकांच्या माध्यमातून महाभारताचा अध्याय वर्णन करण्यासाठी हा संगीतकार अगदी योग्य आहे.
विविध भक्तीपर गाणी, भजने व गझल्स तसेच भगवद् गीता गायलेले अनुप जलोटा पहिल्यांदाच एका टेलिव्हिजन मालिकेसाठी त्यांचे भक्तीमय योगदान देण्यासाठी खूपच आनंदित होते. आपला अनुभव सांगत अनुप म्हणाले, ''मी विविध भक्ती भजने गायली आहेत. पण भगवान कृष्णाचा प्रवास वर्णन करणा-या भजनासाठी दिलेला आवाज माझ्यासाठी पूर्णत: नवीन अनुभव होता. भजन व श्लोक विविध टप्प्यांमध्ये येतात आणि पौराणिकमधील सर्वात संस्मरणीय युद्धातील भगवान कृष्णाच्या प्रवासाचे वर्णन करतात. मला विश्वास आहे की, महाभारताचे वर्णन आणि या कथेमध्ये सादर करण्यात आलेले व्हिज्युअल्स निश्चितच माझे संगीत अधिक विकसित करतील आणि प्रेक्षकांना रंजकअनुभव देतील.''