Join us

अखेर जसलीनसोबत लग्नाच्या चर्चेवर भजन सम्राट अनूप जलोटा यांनी सोडलं मौन, म्हणाले....

By अमित इंगोले | Updated: October 12, 2020 09:31 IST

नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात जसलीन नवरीच्या रूपात आणि अनूप जलोटा हे नवरदेवाच्या रूपात दिसत होते. हा फोटो पाहून दावा केला गेला की, दोघांनी लग्न केलं. 

भजन सम्राट अनूप जलोटा नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहतात. त्यांचं नाव बिग बॉसपासून त्यांची शिष्या जसलीन मथारूसोबत जोडलं जातं. त्यालाही कारण म्हणजे एखाद्या कपलप्रमाणे त्यांची जोडी नेहमी प्रोजेक्ट केली जाते. लोकही त्यांच्या केमिस्ट्रीची तारीफ करत असतात. नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात जसलीन नवरीच्या रूपात आणि अनूप जलोटा हे नवरदेवाच्या रूपात दिसत होते. हा फोटो पाहून दावा केला गेला की, दोघांनी लग्न केलं. 

आता भजन सम्राट अनूप जलोटा यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जसलीनसोबतच्या लग्नाच्या चर्चांना खोट्या आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. 

अनूप जलोटा म्हणाले की, जसलीनची मॉडर्न ड्रेसिंग आमच्या परिवाराला चालणार नाही. आम्ही धोतर-कुर्ता घालणारी माणसे आहोत. भक्ती भजन गातो. जसलीन ते कसं मॅच करू शकेल. मला वाटतं माझ्या आजूबाजूच्या लोकांना जसलीनचा तो अंदाज योग्य वाटत नाही. त्यांनी जोर देऊन सांगितले की, जर ते ३५ वर्षांचेही असते तरी त्यांनी जसलीनसोबत लग्न केलं नसतं. (अनूप जलोटा व जसलीनच्या लव्हस्टोरीवर येतोय चित्रपट! ‘ही’ हॉट बाला असेल हिरोईन!!)

ते पुढे म्हणाले की, जेव्हापासून हा फोटो व्हायरल झाला आहे तेव्हापासून अनेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. यावर ते म्हणाले की, मी तर त्यांनाही सरळ शुभेच्छा देतोय. आता अशा लोकांना काय म्हणावं जे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजला खरं मानतात. (जसलीनसोबत प्रेमाचे नाटक करणार्‍या अनूप जलोटा यांना दर आठवड्याला मिळायचे लाखो रूपयांचे मानधन)

आपल्या या व्हायरल फोटोबाबत अनूप यांनी सांगितले की, हा तर एका सिनेमाचा सीन आहे. ते जसलीनसोबत 'वो मेरी स्टुडंट' मध्ये दिसणार आहेत. सिनेमात अनूप जसलीनच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. हा फोटो त्याच सीनचा आहे.

दरम्यान, ही पहिली वेळ नाही की, अनूप जलोटा आणि जसलीनबाबत अशी चर्चा होत आहे. जेव्हा दोघांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली होती तेव्हाही त्यांच्या नात्याबाबत फार जास्त चर्चा झाली होती. पण नंतर दोघांनी ते केवळ गुरू-शिष्य असल्याचं सांगितलं होतं. 

टॅग्स :अनुप जलोटाजसलीन मथारूसोशल मीडिया