यंदाच्या पर्वातदेखील अनेक लोकप्रिय सेलेब्स शोमध्ये एन्ट्री घेतली आहे, पुढील तीन महिने बंद घरात राहून रसिकांचे कितपत मनोरंजन करण्यात हे स्पर्धक यशस्वी होतील हे पाहणे रंजक असणार आहे. यंदाच्या पर्वातही इतर पर्वाप्रमाणे रंजक घडामोडी घडतील त्यासाठी स्वयंघोषित देवी राधे माँ सहभागी होणार आहे. या शोमध्ये भाग घेण्यासाठी राधे माँला दर आठवड्याला 25 लाख रुपये दिले गेले असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राधे माँ या पर्वातील सर्वाधिक महागडी स्पर्धक असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या पर्वातही भजनसम्राट अनुप जलोटा यांचे जसलीन मथारूसह असलेले अफेअर खूप चर्चेत होते. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बिग बॉसमध्ये दिवसेंदिवस नवनवीन घ़डामोडी होत होत्या. एक अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या या कथित रिलेशनशिपवर कुणाचाही विश्वास बसला नव्हता. भजनसम्राट अनुप जलोटा असे काही करतील यावरच कोणाचा विश्वास नव्हता. या अजब गजब जोडीची मात्र सर्वत्रच चर्चा झाली होती.'बिग बॉस'मध्ये सतत चर्चेत राहण्यासाठी त्यांनी जसलीन मथारूसह अफेअर असल्याची कबुली दिली होती. भजनसम्राट यांच्या अफेअरच्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांची चांगलीच झोप उडवली होती.
सोशल मीडियावरही अनुप जलोटा आणि जसलीन यांच्यावर मीम्स, शायरी आणि जोक्स व्हायरल झाले होते.अनुप आणि जसलीन यांच्या नात्याला जसलीनचे वडिल केसर मथारु यांनीही नाकारलं होते. हे सगळे बनावट असल्याचा केसर मथारु यांनी त्यावेळी दावा केला होता. अखेर अनुप जलोटा घराबाहे आले तेव्हा त्यांनी हे सगळे पब्लिसिटीसाठी केल्याचे सांगत यावर सारावसारव केली.अनूप जलोटा यांनी तथाकथित गर्लफ्रेंड जसलीन मथारूसोबत प्रेमाचे नाटक करायला सांगितले गेले होते. त्यासाठी त्यांना दर आठवड्याला 40 लाख रुपये मानधन म्हणून दिले गेले होते.
मात्र अनुप जलोटा यांना त्यांचा हा पब्लिसिटी स्टंट नंतर खूप भारी पडला होता.भजनसम्रमाट म्हणून त्यांना ओळखले जात होते. केवळ बिग बॉसमध्ये त्यांनी केलेल्या प्रेमाचे नाटकामुळे त्यांची इमेजही खराब झाली. पूर्वाप्रमाणे आदर सन्मान अनुप जलोटा यांच्या वाट्याला नंतर आला नाही. धार्मिक भजन गायक म्हणून त्यांना ओळखले जायचे बिग बॉसनंतर ते जेव्हाही चर्चेत आले तेव्हा जसलीन मथारू हेच एकमेव कारण असायचे.