Join us

टीव्हीवरील हा प्रसिद्ध अभिनेता आहे राज बब्बर यांचा जावई, 'फत्तेशिकस्त'मधून मराठीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:42 IST

2011मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले

बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अनुप सोनीराज बब्बर यांचा जावई आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. अनुप सोनीने क्राईमवर आधारीत शोचं बराच काळ सूत्रसंचालन केलं आहे. तसेच दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या गंगाजल आणि अपहरण चित्रपटातही तो झळकला आहे.

अनुप सोनीने राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बरसोबत लग्न केले आहे. अनुप आणि जुहीची ओळख एका थिएटर ग्रुपमध्ये झाली. दोघे नादिरा बब्बर यांच्या नाटकात दोघांनी काम केले आहे.  2011मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.अनुप आणि जुहीला इमान नावाचा  मुलगा आहे.

  अनुप सोनीने सुपरहिट ठरलेली 'बालिका वधू' मालिकेतही भैरव धरमवीर सिंगही भूमिका साकारली होती.मालिकेतील इतर भूमिकांप्रमाणे ही भूमिकाही रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.टीव्ही मालिकांसह त्याने अनेक हिंदी सिनेमातही विविधांगी भूमिकांमध्ये तो झळकला आहे.

एकाच साचेबद्ध कामात न अडकता नवीन नवीन भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. अनुप 2019मध्ये आलेल्या संजय दत्तच्या प्रस्थानम सिनेमात दिसला होता. तसेच त्याने 2019 मध्ये आलेल्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्तेशिकस्त सिनेमातून मराठीत पदार्पण केले आहे. 

टॅग्स :अनुप सोनीराज बब्बर