Anupamaa TV Serial Update: ‘अनुपमा’ (Anupamaa TV Serial) या मालिकेत एकापाठोपाठ एक धमाके होत आहेत. अनुजसोबत लग्न झाल्यानंतर अनुपमा प्रचंड आनंदी आहे. पण आता तिच्या आयुष्यात बरखा नावाच्या विलनची एन्ट्री झाली आहे. बरसा ही दुसरी कोणी नाही तर अनुज कपाडियाच्या चुलत भावाची पत्नी आहे. बरखा एका खास उद्देशाने अमेरिका सोडून भारतात परतली आहे. बरखाचा उद्देश काय आहे? हे आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कळणार आहेच.
कुटुंबाला भेटून आनंदी होणार अनुपमाअनुजच्या कुटुंबाला भेटून अनुपमाचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. आजच्या एपिसोडमध्ये अनुपमा फक्त आणि फक्त कुटुंबाबद्दलच बोलताना दिसेल. माझ्या कुटुंबाच्या प्रेमात मला विसरू नकोस, असं तिचा आनंद पाहून अनुज म्हणेल. इतक्यात अनुपमा व अनुजला बा फोन करून ‘पगफेरे’ विधीसाठी घरी येण्याचं निमंत्रण देईल. अनुपमा व अनुज निमंत्रण स्वीकारत शाह हाऊसमध्ये जाण्याचं प्लानिंग करतील.
अनुपमा-अनुज होणार बेघर?बरखा भाभीने आत्तापर्यंत अनुज व अनुपमाला आपला प्रेमळ स्वभाव दाखवला आहे. लवकरच तिचा खरा चेहरा समोर येणार आहे. येणाºया एपिसोडमध्ये तुम्ही बघाल की, बरखा आपला पती अंकुशवर अनुजशी प्रॉपर्टी व बिझनेसबद्दल बोल, यासाठी दबाव टाकेल. आमचा विदेशातला बिझनेस बुडाला म्हणून आम्ही भारतात आल्याचं ती सांगेल. कपाडिया हाऊसमध्ये खूप सारी माणसं असल्यानं माझा जीव गुदररतो, याचा वारंवार उल्लेख ती करेल. आता कपाडिया हाऊसमध्ये बरखा भाभी आनंदी नाही म्हटल्यावर दिलदार अनुपमा पुन्हा एकदा तिच्यासाठी आपल्या आनंदाचा त्याग करेल का? अनुजला घेऊन ती घर सोडणार का? या प्रश्नांची उत्तरं येत्या एपिसोडमध्ये तुम्हाला मिळणार आहेत.