Join us

Anupama Spoiler Alert: मालविका नावाचं नवं विघ्न, रद्द होणार अनुज-अनुपमाचं लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 14:31 IST

Anupama Spoiler Alert: अनुपमा मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनेक अडचणीनंतर अनुज व अनुपमा अखेर एक होणार आहेत. पण...

Anupama written update: अनुपमा (Anupama)  या हिंदी मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनेक अडचणीनंतर अनुज व अनुपमा अखेर एक होणार आहेत. फिल्मी अंदाजात दोघांच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. आज रात्रीच्या एपिसोडमध्ये अनुपमा हळद सेरेमनीदरम्यान भावुक झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सगळेजण हळद सेरेमनीनंतर अनुज व अनुपमाच्या लग्नाच्या तयारीला लागतील आणि याचदरम्यान मालविका असं काही करेल की, तिच्या वागण्यानं सगळ्यांनाच धक्का बसेल.

अनुपमाचा वनराजला  अनुपमाच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये अनेक सीन्स तुम्हाला भावुक करतील. अनेक वर्षांपासून अनुपमा टोमणे सहन करतेय. आता ती याबद्दल बोलेल आणि वनराज व बा तिचं म्हणणं मूग गिळून ऐकतील. अनुज सर्वांसमोर अनुपमाला ती किती खास आहे, याची तिला जाणीव करून देईल. अनुज व अनुपमा एकमेकांना हळद लावतील. एक एक करून सगळेच दोघांच्या या आनंदात सामील होतील. एकटी बा मात्र अनुपमाला हळद लावणार नाही. पण असं काही घडेल की, इच्छा नसूनही बाच्या हातून अनुपमाला पहिली हळद लागेल.

मालविका युएसला जाणार...अनुपमा मालिकेत आत्तापर्यंत सर्व फोकस अनुज व अनुपमावर होता. आता पुन्हा एकदा मालविका फोकसमध्ये येईल. मालविका   युएसला जाण्याचा निर्णय घेईल. युएसला जाण्याचा निर्णय तिने अचानक का घेतला? हे मात्र ती कुणालाही सांगणार नाही. मालविका युएसला जाणार हे कळताच अनुजला मोठा धक्का बसेल आणि तो रागारागात लग्न थांबवण्याची धमकी देईल. तू युएसला जाणार असशील तर मी लग्न करणार नाही, असं तो मालविकाला म्हणेल. आता भावाच्या आनंदासाठी मालविका थांबणार की अनुज व अनुपमाच्या लग्नात नवं विघ्न येणार, हे येणाºया एपिसोडमध्येच कळेल.

टॅग्स :टेलिव्हिजनस्टार प्लस