'अनुपमा'मधील Rupali Gangulyला लठ्ठपणामुळे ऐकावे लागले टोमणे, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 04:42 PM2022-07-21T16:42:36+5:302022-07-21T16:53:25+5:30
'अनुपमा' (Anupamaa)फेम अभिनेत्री रुपाली गांगुली(Rupali Ganguly)ला आई झाल्यावर वाढलेल्या वजनामुळे शेजाऱ्यांचे टोमणे ऐकावं लागले होते.
Rupali Ganguly Fat Shamed: आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात मोठा आनंद असतो, परंतु यामुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यापैकी एक म्हणजे वजन वाढणे. प्रग्नेंन्सी आणि बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांचे वजन खूप वाढते. ही सामान्य गोष्ट आहे, पण यामुळे कधी-कधी त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. 'अनुपमा' (Anupamaa)फेम अभिनेत्री रुपाली गांगुली(Rupali Ganguly)ही या सगळ्याचा सामना करावा लागला होता.
रुपाली गांगुलीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, पहिला मुलगा रुद्रांशच्या जन्मानंतर तिचं वजन खूप वाढलं होते. या गोष्टीचा तिला काही प्रोब्लेम नव्हता पण शेजाऱ्यांना त्रास होत होता. तिच्या वाढलेल्या वजनाबाबत शेजारी तिला टोमणे मारायचे. अभिनेत्री म्हणाली रुद्रांशचा जन्म झाला तेव्हा तिचं वजन ५८ किलो होतो पण त्यानंतर ८६ किलो झालं. रुद्रांशला बाहेर फिरायला घेऊन गेली असताना तिला शेजारी राहणार काकी भेटल्या. ज्याना रुपाली ओळखत देखील नव्हती. त्या तिला म्हणाल्या अरे तू मोनिशा आहेस ना, किती लठ्ठ झाली आहे. एका आईवर बोलण्याचा अधिकार यांना कुणी दिला?, बाई कोणत्या कोणत्या गोष्टीतून जाते हे कोणालाच कळत नाही."
रुपाली गांगुली आज टीव्हीवरील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रूपालीला तुम्ही याआधी साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत पाहिलं असेल. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती.पहिल्या चार वर्षात रुपाली गांगुलीने पाच मालिकांमध्ये काम केले. मात्र यापैकी एकही मालिका सहा महिने देखील चालली नाही.
दरम्यान साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली आणि तिच्या करियरला कलाटणी मिळाली. रुपाली गांगुलीने २००० साली सुकन्या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केले.