Join us

'करण कुंद्राने माझी फसवणूक केली', ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली अनुषा दांडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 13:56 IST

अनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे.

टेलिव्हिजन होस्ट आणि व्हीजे अनुषा दांडेकर तिचा एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्राशी झालेल्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली आहे. या ब्रेकअपच्या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी तिला बराच वेळ लागल्याचे सांगितलं. अनुषा सांगते, करण कुंद्राने त्याची फसवणूक केली पण आजपर्यंत या गोष्टीसाठी माफी नाही मागितली. गेल्या वर्षी जानेवारीत अनुषा आणि करणच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. पण सुरुवातीला दोघांनी ही हे नाकारले. नंतर अनुषाने खुलासा केले की, "होय, माझी फसवणूक झाली आहे." प्रश्न आणि उत्तर सत्रादरम्यान अभिनेत्रीने आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर उघडपणे बोलली आहे. 

अनुषा म्हणाली, मी खूप निराश आणि अस्वस्थ होते. पण हे सर्व असूनही मी पुढे जाऊन सत्य स्वीकारले. या काळात मी स्वतःवर प्रेम कसे करावे आणि त्याचा आदर कसा करावा हे शिकले. त्याचवेळी दुसर्‍या फॅनने अनुषाला विचारले की, याक्षणी तुमची रिलेशनशिप स्टेटस काय आहे? यावर अभिनेत्री म्हणते, मी अशा माणसाचा शोध घेत आहे जो उघडपणे हसतो आणि स्त्रियांसोबत प्रामाणिक आहे. तो आतून आणि बाहेरुन दोन्ही बाजूंनी सारखाच असला पाहिजे. 

अनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे. सोबत गायिका अशीही तिची ओळख आहे. अनुषाचा जन्म ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये झाला. देल्ही बेली, सिटी ऑफ गोल्ड आणि एंथोनी कौन है सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.

टॅग्स :अनुषा दांडेकरकरण कुंद्रा