Join us

अप्पी आमची कलेक्टर: अखेर बाप-लेकाची होणार भेट; अर्जुन करणार सिंबाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 14:55 IST

Appi Amchi Collector: अर्जुन, सिंबाचा शोध घेतो आणि त्याची सुखरुपपणे सुटका करतो.

'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेती अप्पी आणि अर्जुन यांची केमिस्ट्री नेटकऱ्यांना विशेष भावली आहे. यामध्येच सध्या या मालिकेत सिंबाच्या अपहरण झालं असून लवकरच अर्जुन त्याचा शोध घेणार असून या बाप-लेकाची भेट होणार आहे.

सध्या मालिकेत सिंबाच्या अपहरणाचा थरार सुरु आहे. सिंबाच्या अपहरणामुळे तब्बल सात वर्षानंतर पहिल्यांदाच अप्पी आणि अर्जुन यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये अर्जुन, सिंबाला शोधूनही काढतो. त्यामुळे आता या बापलेकाची भेट झाल्यामुळे मालिकेत पुन्हा काही रंजक घडामोडी घडतांना पाहायला मिळणार आहेत.

वज्र प्रोडक्शनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन, सिंबाचा शोध घेतो आणि त्याची सुखरुपपणे सुटका करतो. त्यामुळे अर्जुनला सिंबाचं सत्य कळल्यानंतर पहिल्यांदाच या पिता-पुत्राची भेट होणार आहे.

दरम्यान, सिंबा आपलाच लेक असल्याचं सत्य कळल्यानंतर अर्जुन त्याच्या दुसऱ्या लग्नाचं पुन्हा विचार करेल का?आर्यासोबतचा साखरपुडा तो मोडेल का? अप्पी-अर्जुन पुन्हा एकत्र येतील का? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी