Join us

'प्रत्येक वेळी i love you म्हणायची गरज नसते. त्याजागी...'; अर्जुनने सांगितला त्याच्या प्रेमाची व्याख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 5:53 PM

Rohit parshuram: रोहित कायम त्याच्या कुटुंबाविषयी आणि पत्नीविषयी त्याच्या भावना व्यक्त करत असतो.

सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजनांना काही ना काही भेटवस्तू देऊन खूश करायचा प्रयत्न करत आहे. यामध्येच कलाकार मंडळी तरी कशी मागे राहतील. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता रोहित परशुराम याने त्याच्या व्हॅलेंटाइन डे चा प्लॅन सांगितला आहे.रोहित व्हॅलेंटाइन डे ला बायकोसाठी काही खास करत नाही. मात्र, तो दैनंदिन जीवनात तिला लहान मोठ्या कामात मदत करुन प्रेम व्यक्त करत असतो. यामध्येच तो यंदा काय स्पेशल करणार आहे हे सांगितलं. 

 "खरंतर प्रेम व्यक्त करायला लागलंच नाही पाहिजे. ते आपल्या वागण्या-बोलण्यातून दिसतं. तिच्या पिरिअड्सच्या दिवसात मी सकाळी तिच्यासाठी एक कप चहा आणि थोडासा केक अशी छान डिश सजवून देतो. ज्यामुळे तिचे पुढचे चार दिवस छान जातात. प्रत्येक वेळी  I LOVE YOU म्हणायची गरज नसते. पाण्याचा २० लीटरचा जार तिने न सांगता व्यवस्थितपणे हांड्यात ओतून दिला तर त्यातून आपोआप प्रेम व्यक्त होतं. मी हे स्वत:च्या अनुभवावरुन सांगतोय. मालिका करणाऱ्या कलाकारांचे असे काही स्पेशल प्लॅन्स नाही. कारण, अर्जुनवर आणि आप्पीवर प्रेम करणारे रोज एपिसोडची वाट पाहत असतात. त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो", असं रोहित म्हणतो.

पुढे तो म्हणतो, "माझ्या २०० पिढ्यांनी बुधवारचा उपवास केला असेल तर या १४ फेब्रुवारीला बुधवारी सुटी मिळेल. जर ही सुट्टी मिळाली तर तेच खूप मोठं गिफ्ट असेल मग केक वगैरे तर कापूच. शेवटी पूजाला फक्त एक निरोप द्यायचा आहे की तू जशी आहेस तशीच कायम रहा !! तुझ्यात मला माझं बाळ दिसतं! "

दरम्यान, रोहित सध्या आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अर्जून ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला. इतकंच नाही तर त्याने अपार लोकप्रियताही मिळवली. 

टॅग्स :टेलिव्हिजनमराठी अभिनेताव्हॅलेंटाईन्स डेसेलिब्रिटी