Join us

'अप्पी आमची कलेक्टर', 'नवा गडी नवा राज्य', 'लवंगी मिरची' मालिकेत लगबग वटपौर्णिमेची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 7:54 PM

मालिकांमध्ये ‘वटपौर्णिमा विशेष’ भाग दाखवले जाणार आहेत, यात खासकरून 'अप्पी आमची कलेक्टर', 'नवा गडी नवा राज्य', 'लवंगी मिरची' आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत.

झी मराठी मालिकांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे आणि प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मालिकांमध्ये पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. झी मराठी नेहमी आपल्या मालिकेच्या कथांमध्ये नवीन मनोरंजक वळण देऊन प्रेक्षकांचे मन जिंकत असतात. जून महिना म्हटले की येते वटपौर्णिमा लग्न झालेल्या स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचं हे व्रत करतात. या निमित्ताने झी मराठीवरील मालिकांमध्ये ‘वटपौर्णिमा विशेष’ भाग दाखवले जाणार आहेत, यात खासकरून 'अप्पी आमची कलेक्टर', 'नवा गडी नवा राज्य', 'लवंगी मिरची' आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘अप्पी आमची कलेक्टर’ मध्ये आपण पाहणार आहोत की वटपोर्णिमेच्या दिवशी कलेक्टर अपर्णा सुरेश माने आपले कर्तव्य व्रत पूर्ण करत अर्जुनला भ्रष्टचाराच्या आरोपाखाली अटक करणार आहे. दुसरीकडे 'नवा गडी नव राज्य' मध्ये राघव वर येणार आहे एक नवीन संकट, आनंदीचे वटपोर्णिमेचे व्रत वाचवू शकेल का राघवला या संकटातून? ‘लवंगी मिरची’ मध्ये राधाक्काला वट पोर्णिमेचे व्रत ठेवता येईल का ? की यामिनी यातही काही अडचणी आणेल ? तर वटपौर्णिमा विशेष आठवड्यात 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' अद्वैतच्या दीर्घायुष्यासाठी नेत्रा घेणार आहे एक महत्वपूर्ण निर्णय !

तेव्हा पाहायला विसरू नका ‘वटपौर्णिमा विशेष’ आठवडा सोमवार ते शनिवार, 'अप्पी आमची कलेक्टर' संध्या ७ वाजता, 'नवा गडी नव राज्य' रात्री ९ वा., लवंगी मिरची रात्री १० वा. आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.