छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. सध्या या मालिकेत अर्जुन आणि अपर्णा यांच्या नात्यात अनेक चढउतार येत असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच आता अर्जुनला त्याचा मुलगा कोण आहे हे कळणार आहे.
अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी सिंबा कसोशीने प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे अपर्णा ड्रग्स माफीयांवर कारवाई करत आहे. ज्यामुळे तिची वरचेवर अर्जुनसोबत भेट होत आहे. परंतु, त्यांच्यातील दुरावा स्पष्टपणे दिसून येत आहे. यामध्येच आता अमोल किडनॅप होणार आहे. ज्यामुळे या मालिकेला पुन्हा एक वळण मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
वज्र प्रोडक्शनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिप्यासोबत असतांना सिंबाला कोणीतरी किडनॅप करतं. त्यामुळे घाबरलेला दिप्या, अप्पी आणि अर्जुनला या गोष्टीची कल्पना देतो. त्यानंतर अर्जुन आणि अप्पी एकमेकांना भेटतात आणि अमोलचा शोध घ्यायला निघतात.
दरम्यान, अर्जुन, अप्पीकडे अमोलचा फोटो आहे का? असं विचारतो. त्यावर अप्पी सिंबाचा फोटो दाखवते. सिंबाचा फोटो पाहिल्यावर अर्जुन काही काळासाठी स्तब्ध होतो. कारण, गेल्या कित्येक दिवसांपासून तो ज्या मुलाला भेट होता तोच आपला लेक असल्याचं सत्य अर्जुनला कळतं. ज्यामुळे तो प्रचंड भावूक होतो. त्यामुळे आता अर्जुनला त्याचा लेक भेटल्यानंतर या मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येणार? अमोलला नेमकं कोणी किडनॅप केलंय? या प्रकरणामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा एकत्र येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.