Join us

अप्पी आमची कलेक्टर मालिकेत झळणार उज्ज्वल निकम आणि विश्वास पाटील, घेणार अप्पीची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 12:38 IST

अप्पी आमची कलेक्टर मालिकेत लवकरच या मालिकेत दोन दिग्गजांची एन्ट्री होणार आहे.

 झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका विशेष गाजते आहे. प्रेक्षकांकडून तसा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळतो आहे. दरम्यान लवकरच या मालिकेत दोन दिग्गजांची एन्ट्री होणार आहे.  ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि लेखक-कादंबरीकार विश्वास पाटील झी च्या 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत एन्ट्री घेणार आहेत.  'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अप्पी आमची कलेक्टर.   मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.

अप्पीच्या या संघर्षात तिचे बापू, नवरा अर्जुन, भाऊ दिप्या तिच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले आपण पाहिलं. ही मालिका आता चर्चेचं विषय होतेय आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी ठरत आहे, कारण अप्पीने नुकतीच UPSC ची परीक्षा पहिल्या नंबरने पास केली आहे, आणि आता तिचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न दृष्टीपथात येणार आहे.

पण यासाठी तिला अजून एका परीक्षेमधून जावं लागणार आहे ते म्हणजे तिची मुलाखत घेणार आहेत, जेष्ठ विशेष सरकारी वकील 'उज्वल निकम' आणि लेखक आणि IAS ऑफिसर 'विश्वास पाटील' या मालिकेच्या निमित्ताने हे दोन ऑफिसर्स टेलीव्हिजनवर प्रथमच मालिकेत खरीखुरी भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे कलेक्टर बनण्याचा अखेरचा कठीण टप्पा पार करेल का अप्पी? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :झी मराठी