झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेची नायिका अपर्णा नुकतीच कलेक्टर झाली आहे. रविवारी या मालिकेचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ज्यात गावकऱ्यांनी अप्पी कलेक्टर झाली म्हणून तीची गावात वाजत गाजत जंगी मिरवणूक काढली होती. ही भूमिका अभिनेत्री शिवानी नाईक (Shivani Naik) हिने तिच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवली आहे. अप्पी आमची कलेक्टर ही तिने अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका आहे. शिवानी नाईकचा रिअल लाईफ अर्जुन कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
शिवानी अभिनेता अमित रेखी याला डेट करत असल्याचे सांगितले जाते. सफरचंद या नाटकातून तसेच आता कसं करू या नाटकातून या दोघांनी एकत्रित काम केले होते. अमित रेखी हा सध्या कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतून आदित्यची भूमिका साकारत आहे. अमित आणि शिवानी या दोघांची ओळख गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. हे दोघेही एकमेकांसोबत अनेकदा व्हिडीओ बनवताना दिसले आहेत. सोबतच एकमेकांवरील प्रेमाची कबुलीही त्यांनी दिलेली पाहायला मिळते. त्यांच्या या फोटोंवर त्यांच्या अफेअरबद्दल माहिती असलेल्या त्यांच्या मित्रांच्याही त्यावर खूप साऱ्या कमेंट्स असतात.
शिवानीला जेव्हा अप्पी आमची कलेक्टर ही मालिका मिळाली तेव्हा अमित प्रचंड खुश झाला होता. शिवानीसाठी त्याने त्यावेळी एक खास पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने म्हटले होते की, ” प्रचंड अभिमान आणि आनंद, अभिनंदन शिवानी, तुझे कष्ट, तुझा संयम, तुझी जिद्द मी पाहिलीये, प्रत्येक भूमिकेला तू प्रामाणिकपणे न्याय देतेस, अप्पीला सुद्धा तू न्याय देणार, आणि हे पात्र लोकांना नक्की आपलंसं वाटणार यात तिळमात्र शंका नाही” अशी शुभेच्छा देणारी पोस्ट त्याने तिच्यासाठी लिहिली होती.
शिवानी नाईक ही एकांकिका, राज्य नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी झाली होती. इथूनच तिच्या अभिनयाची दखल घेत तिला उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं प्रदान करण्यात आली.मॅट्रिक, अखंड, आता कसं करू या नाटकातून तसेच सफरचंद, वाय या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. तर अभिनेता अमित रेखी बद्दल सांगायचं तर त्याच्याही अभिनयाचा प्रवास हा रंगभूमीवरून झाला होता. भाग्य दिले तू मला या मालिकेत येण्याअगोदर त्याने तुझं माझं जमतंय आणि सफरचंद अशा मालिका चित्रपटातून काम केले आहे. भाग्य दिले तू मला या मालिकेत तो नायकाच्या भावाची म्हणजेच आदित्यची भूमिका साकारत आहे. एक उत्तम अभिनेता म्हणून अमितने आपली ओळख मिळवली आहे.