Join us

'अप्पी आमची कलेक्टर' फेम मनी मावशी सध्या काय करते?; ग्लॅमरस फोटो पाहून जाल चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 16:58 IST

Pushpa chaudhari: मनी मावशी खऱ्या आयुष्यात बरीच ग्लॅमरस आणि बिनधास्त आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. या मालिकेत नुकताच ७ वर्षांचा लीप घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या मालिकेत अनेक नवीन कलाकार दिसून येत आहेत. मात्र, या सगळ्यात प्रेक्षक दोन पात्रांना प्रचंड मिस करत आहेत ते म्हणजे संकल्प आणि मनी मावशी. सध्या हे दोघं कुठे आहेत? मालिकेत पुन्हा त्यांची एन्ट्री होणार की नाही? असे प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत. यामध्येच मनी मावशीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी मनी मावशीची भूमिका साकारली आहे. ग्रे शेड असलेली ही भूमिका त्यांनी अत्यंत सुंदर साकारली असून आज त्यांनी बरीच लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच  सध्या मालिकेत मनी मावशी दिसत नसल्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत. इतकंच नाही तर मनी मावशी आणि संकल्पची एन्ट्री पुन्हा कधी होणार हा प्रश्नही प्रेक्षक विचारत आहेत. यामध्येच  मनी मावशीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी त्यांचे काही वेस्टर्न आऊटफिटमधले फोटो शेअर केले आहेत.

पुष्पा चौधरी सोशल मीडियावर सक्रीय असून कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. यात त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांचे काही फोटो कोलाज केले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये त्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे त्याचा हा अंदाज पहिल्यांदाच चाहत्यांनी पाहिला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमा