Join us

या दिवशी होणार 'अप्सरा आली'चा महाअंतिम सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 7:15 AM

तीन महिन्यांच्या प्रवासानंतर १४ अप्सरांमधून केवळ पाच अप्सरा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांचे प्रेम मिळवले.

ठळक मुद्देमालवणची लाडूबाई ऋतुजा राणे, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा आणि पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे, पुण्याची मैना श्वेता परदेशी या ५ जणींनी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारली.

संपूर्ण भारतात छोटा पडदा म्हणजेच टीव्ही पाहणारा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. त्यात डेलीसोपबरोबर रिअॅलिटी शोजसुद्धा तितक्याच चवीने पाहिले जातात. झी युवावाहिनीवरील संगीत आणि नृत्यावर आधारित 'अप्सरा आली' या कार्यक्रमाने तर संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. महाराष्ट्राची लोककला लावणी आणि इतर नृत्य प्रकारांवर आधारित १४ अप्सरांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आता त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे . येत्या रविवारी १० मार्चला संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रमातील टॉप फाईव्ह अप्सरा महा अंतिम फेरीत एकमेकींशी स्पर्धा करणार आहेत. सुरेखा पुणेकर, दीपाली सय्यद, सोनाली कुलकर्णी या महा अप्सरांबरोबरच महागुरू सचिन पिळगावकरसुद्धा महा अंतिम फेरीचे परीक्षण करणार आहेत.

तीन महिन्यांच्या प्रवासानंतर १४ अप्सरांमधून केवळ पाच अप्सरा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांचे प्रेम मिळवले. मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा आणि पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे, पुण्याची मैना श्वेता परदेशी या ५ जणींनी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पारंपरिक लावणीचा साज आणि अस्सल मातीची लावणी करत अनेक परफॉर्मन्समधून बंदा रुपया परफॉर्मन्सचा मान मिळवत साताऱ्याची गुलछडी माधुरी पवारने अख्ख्या महाराष्ट्राला लावणीच्या ठेक्यावर नाचवले. लावणीचा अस्सल ठसा जपून वेगवेगळ्या फॉर्ममधून लावणी मंचावर सादर करताना ऑल राउंडर ही पदवी मिळवणारी ऐश्वर्या काळेने या मंचाला एका वेगळ्या उंचीवर नेले. वयाने लहान असल्याने सगळ्यांचे लाड करून घेणाऱ्या मालवणच्या लाडूबाईने परफॉर्मन्समधून सगळ्यांनाच खुश केले. गश्मीर महाजनी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी या सगळ्याच कलाकारांना आपल्यासोबत परफॉर्म करण्यासाठी जिने भुरळ घातली अशी ग्लॅमरस किन्नरी दामाने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकले. वडिलांचा नृत्याचा वसा चालवून प्रत्येक परफॉर्मन्स एकदम परफेक्ट करणारी श्वेता परदेशी. या पाचही जणींची लावणीची जुगलबंदी महा-अंतिम फेरीची चुरस वाढवेल. या पाचही जणींपैकी कोण बनेल महाराष्ट्राची पहिली अप्सरा? या अप्सरांमध्ये मुख्य गोष्ट अशी की, एकमेकींसमोर स्पर्धक म्हणून उभ्या ठाकलेल्या असतानाही, सगळ्यांच्यात असलेला जिव्हाळा मात्र एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. प्रेम, आपुलकी आणि खिलाडूवृत्तीने या पाचही अप्सरा अंतिम सोहळ्यात त्यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स देतील. महाअंतिम सोहळ्याचे मुख्य आकर्षण टॉप ५ अप्सरांची जुगलबंदी असेलच. पण त्याचबरोबर महाअप्सरासुद्धा स्पेशल नृत्य परफॉर्म करणार आहेत.

हा अंतिम सोहळा रविवार १० मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना झी युवावर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :अप्सरा आलीसोनाली कुलकर्णीसुरेखा पुणेकर