रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरो के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) शोचं चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेत सुरु आहे. या शोमध्ये सहभागी झालेले प्रत्येक सेलिब्रिटी दरदिवशी धोका पत्करत खेळ पूर्ण करत आहेत. दरम्यान काही जण जखमी होत असल्याचीही माहिती अनेकदा येते. आता बिग बॉस फेम अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) स्टंट करताना जखमी झाली आहे.
अर्चना गौतमने स्वत: सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात तिच्या हनुवटीखाली जखम झाली असून तिने त्यावर पट्टी बांधलेली आहे. 'खतरो के खिलाडी की पहली निशानी' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय. याआधीही स्टंट करताना अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र प्रत्येक स्पर्धक स्टंट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.
'खतरो के खिलाडी' चा सध्या 13 वा सिझन सुरु आहे. यामध्ये टेलिव्हिजनवरील अनेक सेलिब्रिटी सहभागी झालेत. अर्चना गौतम, अंजुम फकीह, रोहित बोस राय, डेजी शाह, शिव ठाकरे, नायरा बॅनर्जी, अंजली आनंद, शिझान खान, सौंदस मौफकीर, डिनो जेम्स, रश्मीत कौर, रुही चतुर्वेदी आणि ऐश्वर्या शर्मा यांचा समावेश आहे,