कार्तिक आणि नायरा पालक होण्यास तयार आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 7:40 AM
प्रत्येक जोडप्याच्या जीवनात एक टप्पा असा येतो की जेव्हा ते तिस-या व्यक्तीला आपल्या जीवनाचा भाग बनवितात.‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ता ...
प्रत्येक जोडप्याच्या जीवनात एक टप्पा असा येतो की जेव्हा ते तिस-या व्यक्तीला आपल्या जीवनाचा भाग बनवितात.‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील विलक्षण लोकप्रिय जोडपे कार्तिक आणि नायरा हे आता पालक बनण्याचा टप्पा गाठण्यास सिध्द झाले आहेत.कायरा (कार्तिक-नायरा) या जोडप्यातील खटकेबाजी, नंतर पार पडलेला भव्य विवाहसोहळा तसेच त्यानंतरचे या दोघांचे प्रेमजीवन यांचे साक्षीदार असलेले या जोडप्याचे लक्षावधी चाहते आता ते पालक कधी बनताहेत,त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत.त्यांची अर्थातच निराशा होणार नाही.कायराने एका अनाथ बालकाला आपल्या घरी आणले असून कीर्ती (मोहेनाकुमारी) हिला दिवस गेल्याचे समजताच तेही आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्याच्या निर्णयापर्यंत येतील.मालिकेच्या कथानकाच्या या टप्प्याबात नायराची भूमिका साकारणारी शिवांगी जोशी म्हणाली,“पालक बनणं ही फार मोठी जबाबदारी आहे.एक अभिनेत्री म्हणून मला कथानकाचा हा टप्पा आव्हानात्मक वाटतो आणि मालिकेतील नायरा म्हणून मला कार्तिकबरोबर जीवनात आता पुढील टप्प्यात प्रवेश करण्याची,म्हणजे पालक बनण्याची कल्पना थरारक वाटते.लहान मुलामुळे जोडपं एकमेकांच्या अधिक जवळ येतं,असं मला वाटतं. कार्तिक आणि नायरा यांनी जीवनात बरंच काही सोसलं असलं,तरी त्यांचं एकमेकांवरील प्रेम अभंग राहिल्यामुळेच ते त्यात टिकून राहिले.आता त्यांच्या जीवनात नवं मूल येऊ घातलं असेल,तर त्यांच्यातील प्रेम अधिकच वाढेल.त्यामुळेच मला वाटतं की कार्तिक आणि नायरा यांनी पालकत्वाची जबाबदारी घ्यावी, कारण त्यामुळे त्यांच्यातील नातं अगदी घट्ट होऊन जाईल.”छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरु असणारी मालिका म्हणून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.2 जानेवरी 2009 पासून सुरु झालेली ही मालिका गेल्या 9 वर्षांपासून ही मालिका रसिकांचं अविरत मनोरंजन करत आहे. नुकतंच या मालिकेनं अडीच हजार भागपूर्ण केले आहेत.केवळ सर्वात जास्त काळ सुरु असलेली मालिकाच नाही तर या मालिकेनं सातत्यानं टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.हा रेकॉर्ड झाल्यानं ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेची टीमसुद्धा भलतीच खुश होती.'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेला छोट्या पडद्यावर सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेकडून टक्कर मिळत आहे.दिवसेंदिवस मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत.