Join us

गाडीचा टायर फुटला; अरमान मलिकच्या कारचा झाला अपघात, थोडक्यात बचावला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:30 AM

अरमान मलिकच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.

'बिग बॉस ओटीटी ३' फेम आणि लोकप्रिय यूट्यूबर अरमान मलिकच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे.  अरमान या अपघातातून थोडक्याच बचावला आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. यावेळी त्यांची पत्नी कृतिका मलिकही या कारमध्ये होती. 

अरमान मलिकची ही लक्झरी कारची किंमत सुमारे 1.37 कोटी रुपये आहे. हा व्हिडीओ शेअर करत कार कंपनीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणतो, "एक आठवड्यापूर्वी मी या कारची तक्रार केली होती. आज आमच्यासोबत दुर्घटना घडली. आज आम्ही शूटिंग करून मनालीहून परत येत होतो, तेव्हा गाडीचा टायर फुटला. आम्ही मरता मरता थोडक्यात बचावलो आहोत. मी कारमध्ये झोपलो होतो आणि योगेश गाडी चालवत होता. कृतिका मागच्या सीटवर बसली होती.  ही गाडी खूप खराब आहे. मला विनंती करायची आहे. मी म्हणेन की या गाडीपासून दूर राहा. या घटनेत आम्ही बचावलो ही देवाची कृपा आहे". यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आज आम्ही मरता-मरचा वाचलो आहोत".

अरमान मलिकने अपघातानंतर कारच्या स्थितीचा व्हिडिओही शेअर केला आहे. कारचे चाक फाटलेले स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, युट्यूबर अरमान मलिकने 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. त्याची तीन लग्न झाली आहेत. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर अरमानने पायल मलिकसोबत लग्न केले. त्यानंतर त्याने पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले. इतकंच नाही तर अरमान त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिकासोबत 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये सहभागी झाला होता. शोमध्ये गेल्यानंतर अरमानला त्याच्या दोन लग्नांबद्दल खूप ट्रोल करण्यात आलं होतं. 'बिग बॉस'नंतरही तो कायम चर्चेत असतो.  

टॅग्स :सेलिब्रिटीबिग बॉससोशल मीडिया