Join us

मदर्स डेच्या निमित्ताने कलाकारांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 10:26 AM

'आई’ या जीवनदायी शब्दाची जादू प्रत्येक बालकाच्या मनावर तो जन्माला आल्यापासून तर त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नेहमीच असते. ‘आ’ म्हणजे ...

'आई’ या जीवनदायी शब्दाची जादू प्रत्येक बालकाच्या मनावर तो जन्माला आल्यापासून तर त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नेहमीच असते. ‘आ’ म्हणजे ‘आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’. म्हणजेच आत्मा आणि ईश्वर यांचे मिलन  ज्या ठिकाणी होते, तो महासंगम म्हणजे ‘आई’. खरं तर ‘आई’ हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अनमोल क्षण समजला जातो. मदर्स डे च्या निमित्ताने काही कलाकारांनी आपल्या आईसोबतच्या आठवणी शेअर केला आहे.पिया अलबेलामधील पूजा ऊर्फ शीन दास म्हणाली, “माझ्या आईसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हसू पसरले आहे. मला आठवतंय मी एकदा माझ्या आईसोबत आजीच्या घरी गेले होते आणि तिथे उन्हाळ्‌याची सुट्टी आम्ही मजेत घालवली. ह्यावर्षी मातृदिनी मी कदाचित चित्रीकरणात व्यस्त असेन पण मला थोडा तरी वेळ माझ्या आईसोबत घालवता येईल अशी आशा मी करते. मी सर्वांच्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देते.”डीआयडी लिटल मास्टर्समधील परीक्षक मास्टर मार्झी पेस्तनजी म्हणाले, “मी मातृदिनी सकाळी लवकर उठून माझ्या आईला भेट देऊन तिला चकित करणार आहे. मग मी तिला शॉपिंगसाठी घेऊन जाईन आणि रात्री आम्ही जेवायला बाहेर जाऊ. आपली आई आपल्याला लहानपणापासून सांभाळते, आपले लाड करते आणि आपण आणि आपण कितीही चिडलो असलो तरी आपल्यावर प्रेमच करते. त्यामुळे माझ्या मते प्रत्येकच दिवस मातृदिन असतो. माझी आई तर नेहमी माझीच बाजू घेते. माझे कधीही माझ्या बाबांसोबत भांडण झाले तर माझी आई मध्ये पडते आणि त्यांना सांगते की माझेच बरोबर आहे आणि तिचे म्हणणे त्यांना ऐकावेच लागते.”कलीरेंमधील मीरा ऊर्फ अदिती शर्मा म्हणाली, “माझी आई नवी दिल्ली येथे राहते आणि मला तिची खूप आठवण येते. पण माझी आजी इथे मुंबईमध्येच राहते. माझी पडद्यावरील आई जसविंदरजीपण इथेच राहतात. मी त्यांना बाहेर घेऊन जाईन आणि आश्चर्यचकित करेन. मला वाटतं आई म्हणजे स्वर्गातून परमेश्वराने पाठवलेली देवदूतच असते. ती सगळ्‌या लहान मुलांची काळजी घेते. माझ्यासाठी माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहे. एकदा मी आणि माझ्या भावाने तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले होते. आम्ही तिची खोली फुगे आणि गुलाबाच्या फुलांनी सजवली आणि तिच्यासाठी केकही बेक केला होता.आम्ही आमची पिगी बॅंक फोडली आणि आम्ही साठवलेल्या पैशातून तिच्यासाठी वॉलेट भेट म्हणून आणले होते.”