Join us

या मालिकेद्वारे अरुण इराणी परतल्या छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 4:54 AM

अरुणा इराणी यांनी बॉबी, चालबाज, हमजोली, फकिरा यांसारख्या अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी चित्रपटांसोबत मालिकांमध्ये देखील त्यांच्या ...

अरुणा इराणी यांनी बॉबी, चालबाज, हमजोली, फकिरा यांसारख्या अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी चित्रपटांसोबत मालिकांमध्ये देखील त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. देस में निकला होगा चाँद, मेहेंदी तेरे नाम की, झाँसी की राणी या मालिकांमधील त्यांच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यांनी मालिकेत काम करण्यासोबतच काही मालिकांची निर्मिती देखील केली होती. सौभाग्यलक्ष्मी या मालिकेत त्या २०१६ मध्ये झळकल्या होत्या. आता दोन वर्षांनंतर त्या छोट्या पडद्यावर परतत आहेत. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या पोरस मालिकेत अभिनेत्री अरुणा इराणी यांची एंट्री लवकरच होणार आहे. अरुणा इराणी या मालिकेत ऑरेकल पुरोहित ही भूमिका साकारणार आहेत. प्राचीन ग्रीसमधील ऑरेकल हे पुजारी होते, जे मनुष्य आणि देव यांच्यामधले माध्यम होते असे म्हटले जाते. ३०० हून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर या मालिकेत काम करण्याविषयी अरुणा इराणी सांगतात, “मी दीड दोन वर्षांनंतर टीव्हीवर परत येत आहे. माझ्या एका जुन्या मित्राने मला या भूमिकेविषयी सांगितले. ही भूमिका मला प्रचंड आवडल्याने मी या मालिकेत काम करण्यास होकार दिला. या मालिकेत मी एका ओरॅकल पुजाऱ्याची भूमिका साकारत आहे. प्राचीन ग्रीसमधील ऑरेकल हे पुजारी होते जे मनुष्य आणि देव यांच्यामध्ये सल्ला देण्यासाठी आणि अंदाज देण्यासाठी प्रेरणायुक्त माध्यम होते. माझ्या पात्राचे व्यक्तिमत्व गूढ असून ते प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे. या मालिकेतील माझा लूक देखील खूपच वेगळा आणि छान आहे. माझ्या या लूकवर मालिकेच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळी अरुणा इराणी पाहायला मिळणार असल्याने या मालिकेबाबत मी खूप उत्सुक आहे."पोरस या मालिकेच्या आगामी भागांमध्ये ऑरेकल पुजारी अलेक्झांडरसाठी एक सल्लागार आणि तत्त्वज्ञाचे काम करणार आहे. अलेक्झांडरला  मेसेडोनियाला परत जाण्यासाठी ऑरेकल पुजाऱ्याने दिलेल्या काही चाचण्यांमधून जावे लागणार आहे. अलेक्झांडर या परीक्षांमध्ये यशस्वी होईल का? याचे उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहायल्यानंतरच मिळणार आहे.