हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या तब्बल सहा दशकांच्या कारकीर्दीत तिनशे पेक्षा अधिक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी सध्या स्टार प्लसवरील ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेत दादीची भूमिका साकारीत आहे.
आपण सर्वांनी त्यांना थेट ‘बॉम्बे टू गोवा’पासून ‘बेटा’ आणि ‘हसीना मान जाएगी’ यासारख्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना पाहिले आहे. त्यांच्या जीवनावरील बायोपिक निर्माण करण्याची कोणी सूचना केली होती का, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मी बरेच बायोपिक आतापर्यंत पाहिले असून ते संबंधित व्यक्तीची फक्त चांगली आणि विधायक बाजूच दर्शवितात. पण संबंधित व्यक्तीच्या जीवनाच्या सर्व बाजूंचे त्यात दर्शन घडले पाहिजे, मग ती चांगली असो की वाईट, असे माझे मत आहे. तसे झाले, तरच तुम्ही त्या व्यक्तीशी प्रामाणिक राहता.”त्या सांगतात, “हो, अनेक निर्मात्यांनी माझ्यावर बायोपिक बनवण्याचा विचार बोलून दाखविला होता. तसा जर तो तयार करण्यातच आला, तर त्यात माझ्या जीवनातील सर्वच पैलूंचे दर्शन घडावे, असा माझा आग्रह राहील. माझ्या भूमिकेसाठी आलिया भट हीच योग्य राहील, असे मला वाटते.”अरुणा इराणीच्या भूमिकेत आलिया भट असेल तर आम्हाला तिला कधी या भूमिकेत पाहतो असे झाले आहे.‘दिल तो हॅप्पी है जी’ सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता फक्त स्टार प्लस वाहिनीवर पाहायला मिळेल.