Join us

अरुंधती अन् अनघा धरणार एकत्र ताल; सासू-सुनेच्या डान्स प्रॅक्टिसचा फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 17:04 IST

Aai kuthe kay karte: सध्या अरुंधती आणि अनघा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या दोघी डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहे.

आई कुठे काय करते ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. या मालिकेतील अरुंधती, संजना आणि अनिरुद्ध या तिघांव्यतिरिक्त मालिकेतील आणखीही काही पात्र चांगलीच लोकप्रिय झाली. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. या मालिकेत अश्विनीने अरुंधतीच्या सुनेची अनघाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे पडद्यावरील या सासू-सुनेची जोडी ऑफ स्क्रिनदेखील तितकीच छान आहे. 

सध्या अरुंधती आणि अनघा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या दोघी डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहे. लवकरच स्टार प्रवाह २०२२ हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यामध्ये अनघा आणि अरुंधती एकत्र मिळून डान्स सादर करणार आहेत. त्यामुळे सध्या या दोघी त्यांच्या परफॉर्मन्सकडे लक्ष देत आहेत.

दरम्यान, या सासू-सुनेचा डान्स पाहण्यासाठी चाहते कमालीची आतुर झाले आहेत.  विशेष म्हणजे मालिकेत ज्या प्रमाणे अनघा आणि अरुंधतीची बॉण्डिंग दाखवण्यात आली आहे. तशीच मैत्री त्यांची ऑफ स्क्रीनदेखील आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार