Join us

"आई कुठे काय करते' मालिका बंद करा..', ट्रोल झाल्यानंतरही अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 12:13 PM

देशमुखांच्या घरी राहण्यावरून वारंवार अरूंधतीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे, अरूंधती आणि अनिरुद्धचा घटस्फोट झाला असून त्यानंतर आता संजनाने घराचा ताबा घेतला आहे. मात्र संजना अरूंधतीची जागा कधीही घेऊ शकत नाही, याची जाणीव देशमुख कुटुंबीय संजनाला वारंवार करून देत असतात. अरुंधती कायमची माहेरी गेल्यामुळे संजनाने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र पुन्हा एकदा अरुंधतीला देशमुखांच्या घरात पाहून संजनाचा पारा चढणार आहे. घटस्फोटानंतर देशमुखांच्या घरी राहण्यावरून वारंवार अरूंधतीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

अनिरुद्धसोबतच्या घटस्फोटानंतर अरुंधती देशमुखांच्या घरातच का राहते, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत होते. आता या सगळ्यानंतर गणेश विसर्जनानंतर अरुंधती अखेर डोंबिवलीला राहाण्यास गेली आहे. तिच्या घरातून गेल्यामुळे संजनाला आनंद झाला आहे. मात्र मालिकेच्या पुढील भागात अरुंधती मुलांना भेटण्यासाठी घरी आलेली दाखवण्यात येणार आहे. मग काय नेहमीप्रमाणे अरूंधतीला घऱात पाहून संजनाचा पारा चढणार आहे. मग यावरूनच या दोघींमध्ये जोराचे भांडण होणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने इंस्टाग्रामवर मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे, ज्यात अरुंधतीने केलेले पोहे देशमुख कुटुंबीय खाताना दिसत आहेत. त्यावर अनिरुद्ध या पोह्याला अरुंधतीच्या हाताची चव असल्याचे म्हणतो. त्यावर आजी दरवाजाबाहेर बोट दाखवून तिकडे बघ असे म्हणते. त्यावेळी गौरीच्या बाल्कनीत तुळशीची पुजा करताना गौरी आणि अरुंधती दिसते. त्यानंतर संजना लगेच गौरीच्या घरी पोहचते आणि तिथे संजना अरुंधतीला म्हणते का माझ्या संसारात आणि घरात लुडबूड करते. त्यावर अरुंधती संजनाला सडेतोड उत्तर देत म्हणते मला घरात येण्यापासून कोणीही अडवायचे नाही.माझी मुले या घरात राहतात त्यामुळे मला या घरात येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही.

मालिका बंद करण्याची होतेय मागणीसध्या दाखवण्यात आलेले कथानक प्रेक्षकांना खटकत आहे. त्यामुळे नेटकरी सोशल मीडियावर मालिकेला ट्रोल करताना दिसत आहे. आई कुठे काय करते मालिकेविरोधात प्रेक्षक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता ही मालिका बंद करा, काय फिरवली आहे मालिका, कुणी तरी या अरुंधतीला थांबवा, ही अरुंधती काय लेडी जेम्स बॉन्ड आहे का ?, चांगल्या मालिकेची पुन्हा माती केली, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. 

नव्या प्रोमोची रंगलीय चर्चाआता अरुंधतीचे हे  बदलेले रूप पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोशल मीडियावर देखील या प्रोमोची चर्चा रंगलेली आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका