'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकांपैकी एक आहे. उत्तम कथानक आणि त्याला साजेशा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका तुफान लोकप्रिय झाली. त्यातच सध्या या मालिकेत अनेक रंगतदार वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अरुंधतीचं यश डोळ्यात खुपू लागल्यामुळे संजना वारंवार तिच्या विरुद्ध षडयंत्र रचत आहे. ऐवढचं काय तर तिने देशमुखांचा समृद्धी बंगलाही स्वत:च्या नावावर केला आहे. मात्र, आता अरुंधती आणि केदार मिळून संजनाला चांगलीच अद्दल घडवणार आहेत.
सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होतोय. यात देशमुखांच्या बंगल्याच्या गार्डनमध्ये बसून अरुंधती आणि केदार संजनाकडून घराचे कागद पत्र कशी परत मिळवायची याबद्दल चर्चा करताना दिसतायेत. घराचे कागद परत मिळाल्यानंतर अनिरुद्ध आणि संजनाने दुसरीकडे कुठे तरी जाऊन रहावं तिने परत या घरात राहून नये कारण तिची नियत चांगली नसल्याचे केदार म्हणतो. संजना पाताळ यंत्री असल्याचं केदार सांगतो.
दरम्यान तितक्यात तिथे विशाखा येते आणि ती अरुंधतीला आई आणि अप्पाना याविरोधात लढायला अजिबात घरावर पाणी सोडायचं नाही. अजिबात दुसरी रहायला जातो असं म्हणायचं नाही. तशीच वेळ आली ना तर आपण सगळं लढू पण हे घर संजनाच्या नावावर होऊ द्यायचं नाही असं विशाखा अरुंधतीला सांगतेय.
संजनाने अरुंधतीला तू इथली कुणीच नाहीस आणि मी मालकीण आहे म्हटलंय. ना पुढे नाव लागलं म्हणून बायको झालीस आणि सगळ्यांच्या विश्वास गैरफायदात घेतलास म्हणून मालकीण झालीस, मी तुझ्या विरोधात लढणार. आई-आप्पांसाठी, माझ्या मुलांसाठी आणि या घरासाठी अशा शब्दांत अरुंधतीने संजनाला खडेबोल सुनावलंं आहेत.