टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने (Dalljiet Kaur) केनियाचा बिझनेसमन निखिल पटेलशी (Nikhil Patel) दुसरं लग्न केलं होतं. तिला पहिल्या पतीपासून जेडन हा ८ वर्षाचा मुलगाही आहे. लग्नानंतर ती केनियाला शिफ्ट झाली. मात्र १० महिन्यातच ती लेकासह भारतात परतली. निखिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं. दुसऱ्या लग्नातही अपयश आल्याने यामुळे तिच्या मनावर खोलवर आघात झाला. नुकतंच निखिल पटेल त्याच्या गर्लफ्रेंडसह मुंबईत आला होता. यानंतर तो दिल्लीत गेला. तेव्हा दलजीतने त्याच्याविरोधात FIR दाखल केली. आता त्याला पुन्हा मुंबईला येऊन पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागणार आहेत.
टेली टॉकच्या माहितीनुसार, 'निखिल पटेल दिल्लीतून मुंबईत परतला आहे. एका लोकप्रिय अभिनेत्रीने त्याला विमानात पाहिलं. मात्र तो अद्याप पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला नाही. दलजीतने आयपीसी कमल 85 आणि 316(2) अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. अद्याप निखिल पटेल आग्रीपाडा पोलिस स्थानकात हजर झालेला नाही. तो पुन्हा केनियाला पळून जातो की काय यावर सर्वांचं लक्ष आहे.'
दलजीत कौर पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहून पूर्णपणे कोसळली होती. तिने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या दिवशी निखिलचा वाढदिवसही होता. तिने त्याला शुभेच्छा दिल्या. मूव्ह ऑन कर असं बोलणं सोपं आहे पण लग्न कसं विसरायचं ज्यामध्ये अनेक लोकांनी सुखाचे अश्रू वाहिले आहेत? असा प्रश्न तिने उपस्थित केला.
दलजीत कौरचं पहिलं लग्न शालीन भनोटसोबत झालं होतं. त्यांना जेडन हा मुलगा झाला. मात्र काही वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. दलजीतने शालीनवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप लावले होते. यानंतर गेल्याचवर्षी दलजीतने निखिल पटेलसोबत दुसरं लग्न केलं. निखिलचंही हे दुसरं लग्न होतं. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलीही आहेत.