Join us

मालिका संपताच नेहाचा ग्लॅमरस अंदाज आला समोर, क्रॉप टॉपमधला व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 18:41 IST

Prarthana Behere : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या चर्चेत आली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सध्या चर्चेत आली आहे. नुकतीच तिच्या 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत तिने नेहाचे पात्र साकारले होते. या मालिकेतून तिला खूप प्रेम मिळाले. या मालिकेत प्रेक्षकांना तिचा सोज्वळ, साधेपणा खूप भावला.मालिका संपल्यानंतर नुकताच तिने आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे.

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती या माध्यमातून ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. साजेसा मेकअप व केस मोकळे सोडून तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

प्रार्थनाच्या व्हिडीओवर एका युजरने म्हटले की, खूप छान दिसत आहेस. तर दुसऱ्याने लिहले आहे, बोल्ड अंदाज पहिल्यांदाच पाहिला. आणखी एका युजरने लिहले की, मस्त दिसतेस. मात्र एकाने म्हटले की, झोपेतून उठल्यासारखी दिसतेस थोडा मेकअप करत जा.प्रार्थना बेहरे हिने टेलिव्हिजनवरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून करिअरची सुरुवात केली आहे. त्यानंतर तिने मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिस्टर सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे