Join us  

"मी तिच्या संपर्कात नाही...", आशा नेगीचं अंकिता लोखंडेबद्दल वक्तव्य, म्हणाली, "तिने बरेचदा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:11 PM

'पवित्र रिश्ता' संपल्यानंतर आशा नेगी मात्र अंकिताच्या संपर्कात नसल्याचं म्हणाली.

'पवित्र रिश्ता' ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका. यातील मानव-अर्चनाची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप गाजली. अनेक वर्ष ही मालिका चालली. अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande)  मालिकेत मुख्य भूमिका साकारली. तर सुरुवातीचे काही वर्ष सुशांतसिंह राजपूत मानवच्या भूमिकेत होता. नंतर त्याने मालिका सोडली. यामध्ये मानव-अर्चनाची मुलं, त्यांची लग्न, नातवंडं हे सुद्धा दाखवण्यात आलं होतं. अभिनेत्री आशा नेगीने (Asha Negi) मालिकेत अंकिताच्या मुलीची भूमिका साकारली होती. मालिका संपल्यानंतर आशा नेगी मात्र अंकिताच्या संपर्कात नसल्याचं म्हणाली. काय आहे यामागचं कारण?

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आशा नेगी म्हणाली, "मी रिद्धी डोगरा, करण वाही, सुरभी यांच्या संपर्कात असते. पण मी अंकिताच्या संपर्कात नाही. जेव्हा आम्ही समोरासमोर येतो तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने भेटतो. पण इतर वेळी आमचा फारसा संपर्क नाही. याला मीच कारणीभूत आहे. खरं सांगायचं तर अंकिताने माझ्याशी संपर्क ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण प्रॉब्लेम माझ्यातच आहे."

ती पुढे म्हणाली, "मी फार सोशल होत नाही. हे भेटणं, गप्पा मारणं मला जमत नाही. अंकिता खूप चांगली आहे. तिने अनेकदा मला फोन केला आहे, मला घरी बोलवलं आहे. पण मीच जरा अँटी सोशल टाईपची मुलगी आहे. करण, रिद्धी, सुरभी हे अजूनही माझे मित्र आहेत कारण ते मला ओळखून आहेत. माझा स्वभाव त्यांना समजला आहे आणि त्यांनी तो स्वीकार केला आहे."

आशा नेगी 'हनिमून फोटोग्राफर' सीरिजमध्ये दिसणार आहे. २७ सप्टेंबर रोजी सीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे. ही एक मर्डर मिस्ट्री असणार आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार