Join us

एमटीव्ही रोडीज - जर्नी इन साउथ अफ्रिकामध्ये 'अल्टिमेट चँपियन्स' ठरले आशिष भाटिया आणि नंदिनी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 8:27 PM

‘एमटीव्ही रोडीज- जर्नी इन साउथ आफ्रिका’मध्ये पहिल्यांदाच एक नाही तर दोन सर्वोच्च विजेते मिळाले आहेत

भारतातील सर्वांत मोठा साहस रिअलिटी टेलिव्हिजन शो असलेल्या ‘एमटीव्ही रोडीज- जर्नी इन साउथ आफ्रिका’मध्ये पहिल्यांदाच एक नाही तर दोन सर्वोच्च विजेते मिळाले आहेत! आव्हाने, एलिमिनेशन्स, नाट्यमय वळणं आणि दक्षिण आफ्रिकेतील रोमांचक परिसरातील अनेक आठवड्यांच्या घडामोडींनंतर बडी जोडी आशिष भाटिया आणि नंदिनी हे नवीन सीजनचे ‘अल्टीमेट चँपियन्स’ ठरले आहेत. अभिनेता सोनू सूद होस्ट असलेल्या या सीजनची फिनाले अतिशय थरारक लढत होती, कारण सर्व फायनलिस्टसनी हे विशेष प्रतिष्ठेचे पद प्राप्त करण्यासाठी शर्थीची झुंज दिली होती. केप टाऊनमधील प्रसिद्ध व्हिक्टोरिया आणि आल्फ्रेड (व्ही अँड ए) जलाशयाजवळ या अनेक शहरांमधील मोहीमेची सांगता झाली.

सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशी लढत झालेल्या ग्रँड फिनाले ‘रेस टू द टॉप’ मध्ये असाधारण डावपेच, निश्चय आणि दृढतेची गरज होती. फायनलिस्टस बडी जोड्या केव्हीन अल्मासिफर- मूस जट्टाना, युक्ती अरोरा- जसवंत बोपन्ना, गौरव अलुग- सिमी तलसानिया आणि आशिष भाटिया- नंदिनी यांना एका अनपेक्षित व तब्बल ४ टप्पे असलेल्या खडतर रॉडीज शैलीच्या आव्हानाला सामोरे जावे लागले व केप टाऊनच्या रमणीय शहराजवळच्या त्यांच्या वाटचालीमध्ये धक्कादायक ट्विस्टस होते. नाट्यमय सस्पेन्सनंतर आशिष आणि नलिनी त्यांनी कष्टाने जिंकलेल्या मुकुटाचा ताज स्वीकारताना समोर आले! विजेत्यांच्या जल्लोषामध्ये सहभागी होताना हॉस्ट सोनू सूदनेही लाईव्ह साउथ आफ्रिकन संगीताच्या तालावर ठेका धरला.

हा शो पूर्ण झाल्यानंतर सोनू सूद म्हणाला, मला दोघांसाठी- आशिष (भाटिया) आणि नंदिनीसाठी अतिशय आनंद होतो आहे. त्यांनी असाधारण एकाग्रता आणि दृढनिश्चय दर्शवला व त्यासह सुरुवातीपासूनच त्यांनी चाणाक्ष असे डावपेच वापरले. एमटीव्ही रोडीज- जर्नी इन साउथ आफ्रिकामध्ये हॉस्ट म्हणून काम करणे माझ्यासाठी नेहमीच विशेष राहील, कारण ह्यामध्ये ह्या वाटचालीत सर्व स्पर्धकांमध्ये खरा रोडीज भाव मला बघता आला. त्यांना दिशा देणे व मार्गदर्शन करणे माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता.

टॅग्स :एमटीव्हीसोनू सूद