Join us

आश्का गोराडियाने मालदीविध्ये असा सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस, Romantic Photo सोशल मीडियावर Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 2:29 PM

आश्का ही गेल्या अनेक वर्षांपासून कामासाठी मुंबईत राहात असली तरी ती मुळची अहमदाबादची आहे.

टीव्ही अभिनेत्री आश्का गोराडियाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बिझनेसमन ब्रेंट ग्लोबसोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस 3 डिसेंबरला आहे. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या 16 दिवसांपुर्वीच हे दोघं मालदीवमध्ये क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. तिच्या इन्स्टा अकाऊंटवर नजर टाकताच तुम्हाला तिचे रोमँटीक मुडवाले फोटो पाहायला मिळतील. शेअर केलल्या फोटोंवर तिने समर्पक असे  कॅप्शनही दिले आहेत. फोटोत दोघांची रोमँटीक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

आश्का आणि ब्रेंटची भेट गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेत एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली होती. ते दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. ब्रेंट हा एक व्यवसायिक आहे. तो मुळचा अमेरिकेचा असला तरी आश्कासाठी तो गेल्या सप्टेंबरपासून भारतातच राहात आहे. विशेष म्हणजे आश्काने तिचे लग्न हे अहमादाबाद येथ केले होते. अहमदाबादमध्ये लग्न करण्यामागे एक खास कारण  होते  ते म्हणजे आश्का ही गेल्या अनेक वर्षांपासून कामासाठी मुंबईत राहात असली तरी ती मुळची अहमदाबादची आहे. तसेच ब्रेटच्या एका चुलत भावाचे लग्न देखील गुजरातमध्येच झाले आहे. त्यामुळे त्याची देखील गुजरातमध्येच लग्न करण्याची इच्छा होती आणि त्यात त्याला गुजराती जेवण खूप आवडते. 

आश्काचे हे दुसरे लग्न आहे. पहिले लग्न 2006 मध्ये रोहित बख्शीसोबत केले होते. मात्र फार काळ त्यांचे हे लग्न टिकले नाही आणि त्यांनी 2016 मध्ये काडीमोड घेतला.  2016 मध्ये ब्रेंटला डेट करणे सुरु केले होते.आश्का सध्या छोट्या पडद्यावरुन दूर आहे. ती शेवटच्यावेळी 'नागिन 2' मध्ये दिसली होती. यासोबतच आश्काने 'कुसुम', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहीं तो होगा', 'विरुद्ध', 'मेरे अपने', 'सात फेरे', 'लागी तुझसे लगन', 'कभी-कभी प्यार कभी-कभी यार', 'सिंदूर तेरे नाम' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.