Join us

Shark Tank India 2 मधून अश्नीर ग्रोव्हर आउट; 'या' दिग्गज उद्योजकाची एंट्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 16:12 IST

लवकरच 'शार्क टँक इंडिया'चा दुसरा सीझन येणार आहे. याचा एक प्रोमोही जारी करण्यात आलाय.

Shark Tank India Season 2 Judges: 'शार्क टँक इंडिया'च्या पहिल्याच सीझनने TRPच्या यादीत चांगलीच छाप पाडली आहे. प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या या रिअॅलिटी टीव्ही शोचा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. पण, या दुसऱ्या सीझनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. निर्मात्यांनी या सीझनमध्ये गेल्या हंगामातील सर्वात लोकप्रिय जज अश्नीर ग्रोव्हरला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शोच्या पहिल्या प्रोमो व्हिडिओमध्ये हेच दिसून आले आहे.

या वर्षी शोमध्ये एक नवीन शार्क्स येणारअनुपम मित्तल, अमन गुप्ता, नमिता थापर, विनिता सिंग, पियुष बन्सल आणि अमित जैन हे दिग्गज उद्योजक या वर्षी शार्क टँकमध्ये असणार आहेत. या सीझनमध्ये अमित जैन हा नवा चेहरा असणार आहे. निर्मात्यांनी फोनपेचे को फाउंडर अश्नीर ग्रोव्हरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे वृत्त आहे. प्रोमोमध्ये तसेच दिसून येत आहे. पण, मार्केटिंग स्टंट आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय.

अश्नीरमुळे पहिला सीझन हीटमागच्‍या सीझनमध्‍ये अशनीरची डील करण्याची आक्रमक पद्धत लोकांना खूप आवडली होती. याशिवाय त्‍याचे दमदार वन-लाइनर्सही खूप लोकप्रिय झाले. पण यावेळी निर्मात्यांनी शोमध्ये काही मोठे बदल केले आहेत. अखेरचा सीझन रणविजय सिंगने होस्ट केला होता, तर या सीझनमध्ये कॉमेडियन राहुल दुआ दिसणार आहे.
टॅग्स :टेलिव्हिजन