सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या फॅन्ससह संवाद साधतात.त्यांच्यासह आगामी सिनेमा, ट्रेलर, भूमिका याविषयी गप्पा मारतात. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने सेलिब्रिटी सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक अभिनय अभिनेत्री म्हणजे क्षेत्रात यशस्वी ठरलेली आश्का गोराडिया तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की आपल्या फिटनेसमुळे आजच्या अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. आश्का गोराडिया सध्या आपल्या हॉट फोटोजमुळे चर्चेत आहे. आश्काच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की आश्का किती फिटनेस फ्रिक आहे ते.
आपल्या फॅन्ससह ती फिटनेस मंत्राही शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हीडीओ शेअर केला आहे. समुद्र किनाऱ्यावर धम्माकेदा योगा व्हीडीओ शेअर करताच फॅन्सच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या व्हीडीओला समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. या व्हीडीओत ती अतिशय बोल्ड रुपात दिसतेय. खास गोष्ट म्हणजे तिच्या विविध योग मुद्रा तिचे पती ब्रेंड गोबलने कॅमे-यात कैद केल्या आहेत. फिटनेसविषयी कामय जागरुक राहणारी आश्का हॉट योगा करतानाचे व्हिडिओ कायम शेअर करत असते. तिच्या प्रत्येक व्हीडीओल नेटीझन्स भरभरून लाईक्स आणि कमेंट करत असतात.
आश्का गोराडियाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बिझनेसमन ब्रेंट ग्लोबसोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस 3 डिसेंबरला आहे. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या 16 दिवसांपुर्वीच हे दोघं मालदीवमध्ये क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. आश्का आणि ब्रेंटची भेट गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेत एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली होती. ते दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. ब्रेंट हा एक व्यवसायिक आहे.
तो मुळचा अमेरिकेचा असला तरी आश्कासाठी तो गेल्या सप्टेंबरपासून भारतातच राहात आहे. विशेष म्हणजे आश्काने तिचे लग्न हे अहमादाबाद येथ केले होते. अहमदाबादमध्ये लग्न करण्यामागे एक खास कारण होते ते म्हणजे आश्का ही गेल्या अनेक वर्षांपासून कामासाठी मुंबईत राहात असली तरी ती मुळची अहमदाबादची आहे. तसेच ब्रेटच्या एका चुलत भावाचे लग्न देखील गुजरातमध्येच झाले आहे.