Join us

'रंग माझा वेगळा' फेम अश्विनी दिसणार झी मराठीवरील या मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 6:31 PM

Rang Maza Vegla Fame Vaishali Bhosale : 'रंग माझा वेगळा' फेम अश्विनी उर्फ वैशाली भोसले तिच्या नवीन मालिका आणि त्यातील भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले होते. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अश्विनीची भूमिका अभिनेत्री वैशाली भोसले (Vaishali Bhosale) हिने साकारली आहे. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. दरम्यान आता ती लवकरच नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. झी मराठीवर नव्याने सुरू होत असलेली मालिका 'सारं काही तुझ्याचसाठी'(Sare Kahi Tuzyachsathi)मध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

झी मराठीवर लवकरच दाखल होणाऱ्या 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे, अभिनेते अशोक शिंदे आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेची कथा दोन बहिणींच्या नात्यावर आधारीत आहे. काही कारणांमुळे २० वर्ष एकमेकांपासून दूर राहिलेल्या या बहिणींना नियती एकत्र आणू शकेल का अशी कथा मालिकेची आहे. या मालिकेत खुशबू आणि शर्मिष्ठा बहिणींच्या भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री वैशाली भोसले या मालिकेत खुशबूच्या जावेची म्हणजेच मंजूची भूमिका साकारणार आहे. 

 नुकतेच या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे आणि ही मालिका २१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रसारीत होणार आहे. वैशालीचे चाहते तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

वर्कफ्रंट...

वैशाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने मालिका व नाटक या माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. वैशालीची मराठी सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून झाली. तिने रंग माझा वेगळा शिवाय बऱ्याच मालिकेत काम केले आहे. यात ब्रह्मांडनायक,लक्ष्य, बंध रेशमाचे,तू माझा सांगाती, चंद्र आहे साक्षीला आणि मन झालं बाजिंद मालिकेत काम केले. झी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टारमध्ये ती झळकली आहे. रमेश मोरे लिखित आणि दिग्दर्शित टॉपर वेबसीरिजमध्येही तिने काम केले आहे.

टॅग्स :स्टार प्रवाहझी मराठी