Join us

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भाव्या गांधीवर भडकले असित कुमार मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2017 8:31 AM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेली आठ वर्षं भाव्या गांधी टप्पू ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गेली आठ वर्षं भाव्या गांधी टप्पू ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. पण त्याने आता ही मालिका सोडली असून राज अनादकत आता टप्पूची भूमिका साकारणार आहे. भाव्या एक गुजराती चित्रपट करत असल्याने त्याने ही मालिका सोडली आहे. तसेच त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत असून त्याला चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे त्याच्या आईने नुकतेच सांगितले आहे. पण त्याच्या या निर्णयामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी खूश नाही आहेत. याविषयी असित कुमार मोदी सांगतात, "भाव्याच्या बदलेल्या वागणुकीमुळेच आम्ही टप्पू या भूमिकेसाठी नवीन कलाकाराचा विचार केला. भाव्या या मालिकेचा गेल्या अनेक वर्षांपासून भाग आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या भूमिकेला योग्य न्याय देत नव्हता. त्यामुळे त्याला बदलणे हे गरजेचे होते. तारक मेहता करत असताना त्याने काही दुसरे प्रोजेक्ट घेतले आणि त्यांना प्राधान्य दिले. तो कधी बदलेल असे मला कधीच वाटले नव्हते. या गोष्टीचा मला खरेच खूपच त्रास झाला. आज त्याला जी काही ओळख आहे ती केवळ तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे आहे. माझ्या मालिकेत एकूण 26 जण काम करत आहेत. त्यातील अनेकजण वयाने लहान असून त्यांचे सध्या शिक्षण सुरू आहे. त्यांच्या शिक्षणाकडे मी नेहमीच लक्ष देतो. ही मुले माझी स्वतःची मुले आहेत, असेच मी त्यांना वागवतो. कथेच्या मागणीनुसारच मी सुरुवातीला सगळ्या कलाकारांची निवड केली होती. टप्पूने एक बालकलाकार म्हणून खूप चांगले काम केले होते. पण कॉलेजला तो जायला लागला असे दाखवल्यापासून त्याचा अभिनय तेवढा चांगला होत नाहीये. राज टप्पू ही भूमिका चांगली साकारेल अशी मला खात्री आहे."