Join us

पैशाची नाही तर मनाची श्रीमंती लागते, जे भल्या भल्यांना नाही जमलं ते 'तारक मेहता'च्या असित मोदींनी करुन दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 8:06 PM

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतल्या कलाकार कोरोना काळातही मालामाल होत आहेत. कारण मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी कलाकारांना मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्वामुळे मालिकांचं चित्रिकरण थांबलं आहे, रसिकांचे मनोरंजन थांबता कामा नये म्हणून अनेक टीव्ही निर्मांत्यांनी राज्याबाहेर जात शूटिंग सुरु केल्या आहेत. असे असले तरी कोरोनाचे संकट तिथेही आहेच. कितीही खबरादारी घेतली तरी अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. काही कलाकारांकडे कामच नसल्यामुळे घरीच बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

मात्र  'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतल्या कलाकार कोरोना काळातही मालामाल होत आहेत. कारण मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी कलाकारांना मदतीचा हात पुढे केला आहे.  इतर मालिकांप्रमाणे तारक मेहताचे देखील गुजरातमध्ये शूटिंग सुरु आहे. कोरोना काळात सुरु असलेला काळाबाजार यावर मालिका आधारित आहे. कथानकात ज्या कलाकारांची गरज होती तितकेच कलाकार सध्या काम करत आहेत. बाकीचे मात्र घरी बसून आहेत.

अब्दुलची भूमिका साकारणारे अभिनेते शरद शंकला यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सध्या सुरु असलेल्या कथानकात माझ्या भूमिकेसाठी काम नव्हते. त्यामुळे मी घरीच आहे.काम नसले म्हणून माझे मानधन थांबले नाही. नियमितपणे माझ्या अकाऊंटमध्ये मानधन जमा होत आहे. असित मोदी सारखे निर्माते आम्हाला लाभले आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांच्यामुळेच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाहीय.

तर नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांना तर गेल्याच वर्षी कॅन्सरचे निदान झाले होते. गेल्या वर्षभरात केवळ ४ ते ५ भागासाठी काम केले आहे.  6-7 महिन्यांपासून काम करत नसले तरीही आर्थिक अडचण त्यांना भासली नाही. आजारपणातही असित मोदी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे होते. लॉकडाऊनमध्येही त्यांनी साथ सोडली नाही. आधी तब्येतीमुळे आणि आता कोरोना लॉकडाऊनमुळे काम करणे शक्य नसले तरी आमचे मानधन न कापता आमच्या खात्यात जमा होते. 

असित मोदी असे एकमेव निर्माते आहेत ज्यांनी कलाकारांना काम न करता कलाकारांचे मानधन मात्र नियमित सुरु ठेवले आहे. कोरोनामुळे सारेच घरात बंदिस्त आहेत. अनेक मालिका बंद पडल्या आहेत. अशा आर्थिक अडचण तर येणारच. मात्र तारक मेहता मालिकेला फारसे आर्थिक नुकसान झालेले नाही. कलाकार मालिकेत काम करत असो वा नसो मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराला घरबसल्या मानधन देण्यात येत असल्यामुळे करावे तितके कौतुक कमीच. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा